सर्वात मोठी बातमी, इराणकडून अमेरिकेला प्रत्युत्तर; लष्करी तळावर हल्ला

Iran Airstrike On US Military Base : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, इराणने सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हवाई हल्ला केला आहे. याबाबत इराणच्या (Iran) वृत्तसंस्थेनेकडून माहिती देण्यात आली आहे.
अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या तीन अणु तळांवर हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर देत आता इराणने सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हवाई हल्ला केला आहे.
इराणच्या मेहर न्यूज एजन्सीनुसार, इराणने अमेरिकेला योग्य उत्तर दिले आहे. इराणने सीरियातील (Syria) अमेरिकेच्या लष्करी तळाला टार्गेट केले आहे. इराणकडून हा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला असल्याची माहिती महेर न्यूज एजन्सीकडून (Maher News Agency) देण्यात आली आहे. इराणचे राजदूत अमीर साई इरावनी म्हणाले की, अमेरिका आपले जे काही नुकसान करेल, तेच नुकसान त्याचेही होईल. इराण योग्य उत्तर देण्यास सक्षम आहे.
शनिवारी रात्री अमेकिकेने इराणच्या नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो अणु तळांवर बी-2 बॉम्बरने हल्ला केला होता. याबाबत माहिती देताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणच्या अणुस्थळावर हल्ला केला असल्याचा दावा केला होता.
सीरियाचे तळ आणि इराण इराणचा सर्वात जवळचा अमेरिकन तळ इराकमध्ये आहे, परंतु सीरिया देखील फार दूर नाही. हसाका प्रांत इराणपासून सुमारे 1100 किमी अंतरावर आहे, या हल्ल्यात किती नुकसान झाले आहे याची माहिती नाही. परंतु बशर अल-असदच्या काळात इराणचा सीरियावर मजबूत ताबा होता आणि त्याचे प्रॉक्सी अजूनही तेथे कार्यरत आहेत.
जबरदस्त, शानदार ‘या’ संघाने रचला इतिहास; सलग पाच विजय अन् T20 World Cup 2026 साठी पात्र