इराणला मी फक्त दोन आठवडे देतो; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला थेट अल्टिमेटम

Israel-Iran Conflict : इस्रायल आणि इराण संघर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाचं विधान केलं आहे. अमेरिकेच्या लष्करी कारवाईपासून बचाव करण्यासाठी इराणकडं जास्त वेळ नाही. (Iran) मी एक निश्चित वेळ देत आहे. ती वेळ जास्तीत जास्त दोन आठवडे असेल, असं म्हणत ट्रम्प यांनी इराणला थेट अल्टिमेटमच दिलाय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, परिस्थिती कशी असते यावर सर्व अवलंबून असेल. इराण आणि इस्रायलमधील युद्धात युरोप फारशी मदत करू शकणार नाही. इराणने युरोपशी बोलायचे नाही. जे बोलयचे आहे ते आपल्याशी बोलायचे आहे. युरोप यामध्ये काहीही शकणार नाही.
इराणशी युद्धात इस्रायलला एका दिवसाचा खर्च किती? जाणून व्हाल थक्क
दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी जिनेव्हा येथे त्यांच्या युरोपीय समकक्षांसोबत चर्चा केली होती. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे विधान केले. युरोपीय नेत्यांनी इराणला वॉशिंग्टनशी थेट संवाद साधण्याचा आग्रह केला. यामुळे अब्बास अराघची यांची युरोपिय देशांसोबतची चर्चा कोणताही मार्ग न निघता संपली.
इस्रायल आणि इराणमधील युद्ध १३ जून रोजी सुरू झाले. जेव्हा इस्रायली हवाई दलाने इराणी भूभागावर हल्ले सुरू केले. त्यात इराणचे आर्मी प्रमुख आणि कमांडरचा मृत्यू झाला. तसेच अणू शास्त्रज्ञांचाही मृत्यू झाला. त्यानंतर इराणनेही इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले. यामध्ये बॅलिस्टिक आणि हायपरसॉनिक शस्त्रांचा समावेश आहे.
इस्रायलने आपल्या हल्ल्याचे समर्थन करताना म्हटले की, इराणवर केलेली ही कारवाई अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्यासाठी आहे. दरम्यान, अमेरिकास्थित मानवाधिकार संस्थेच्या मते, इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणमध्ये ६३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी इराणी हल्ल्यात इस्रायलमधील २४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.