Download App

Israel and Hamas war : प्रियकराच्या मृतदेहासह ती… हमासच्या हल्ल्यात वाचलेल्या तरूणीने सांगितली आपबिती

Israel and Hamas war : इस्रायल (Israel) आणि हमासमधील (Hamas) युध्दाला 7 नोव्हेंबरला एका महिन्याचा कालावधी होईल. पण, अद्यापही दोन्हीकडून हल्ले सुरूच आहे. इस्त्रायलकडून गाझाविरोधात जमिनी कारवाई सुरू आहे. यामध्ये असंख्य सामान्य नागरिकांना मारलं जात आहे. अशीच एक अंगावर शहारे आणणारी एका इस्त्रायली महिला मॉडेलने सांगितलेली आपबीती पाहूयात…

‘राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी….’, भुजबळांच्या ऑडिओ क्लिपवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

27 वर्षीय इस्त्रायली महिला मॉडेल नोआम मजाल बेन-डेविड हिने एका वाहिनीला माहिती देताना इस्त्रायल हमास युद्धात तिच्यावर ओढावलेल्या हादरवणारा प्रसंग सांगितला. ती म्हणाली, ही मॉडेल आणि तिचा प्रियकर 7 ऑक्टोबरला सकाळी 6.30 वाजता सुपरनोवा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये गेलेले होते. तेव्हा मोठे स्फोट झाले. त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र हमासच्या लोकांनी या ठिकाणाचं दारं लावलं होतं.

Yeh Rishta Kya Kehlata Hai: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका आजपासून ‘स्टार प्लस’ वाहिनीवर

चहू बाजूंनी गोळ्या झाडल्या जात होत्या. त्यामुळे तिच्यासह आणखी 16 जणांनी लपण्यासाठी कचराकुंडीचा आधार घेतला. मात्र यावेळी हमासच्या लोकांनी तिच्या प्रियकराला गाठलं आणि त्याच्या छातीवर गोळी मारली. ती देखील जखमी झाली होती. त्यामुळे हमासच्या लोकांनी वाटलं की देखील मारली गेली आहे.

दिल्लीत ऑड-इव्हन नियम लागू, शाळांनाही सुट्टी, प्रदूषण रोखण्यासाठी केजरीवाल सरकारचे मोठे निर्णय

तर त्या कचराकुंडीत लपलेल्या 16 पैकी केवळ 4 जणच वाचू शकले. हमासच्या लोकांनी इस्त्रायलमध्ये ट्रक, दुचाकी, चारचाकी वाहनांनी प्रवेश करत हल्ले करायला सुरूवात केली होती. दरम्यान आपल्या मारल्या गेलेल्या प्रियकराच्या मृतदेहासोबत ही तरूणी कित्येक तास त्या कचरकुंडीत दबलेली होती. तिचा प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. मात्र तीचा जीव वाचला होता.

Tags

follow us