Israel Attack : रात्रभर हल्ले सुरुच; 300 लोकांचा मृत्यू, साडेतीन हजार जखमी

Israel Attack : इस्रायलमधील (Israel Attack) परिस्थिती स्फोटक बनली आहे. हमास दहशतवादी संघटना (Hamas terrorist organization) गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या (Israel) हद्दीत हल्ले करत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इस्रायल चांगलाच हादरला आहे. विशेष म्हणजे, शनिवारी रात्रभर इस्त्राएलमध्ये हल्ले सुरुच होते. त्यामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली असून आता मृतांचा आकडा 300 झाला आहे. तर तब्बल 3500 […]

Letsupp Image   2023 10 07T124657.457

Letsupp Image 2023 10 07T124657.457

Israel Attack : इस्रायलमधील (Israel Attack) परिस्थिती स्फोटक बनली आहे. हमास दहशतवादी संघटना (Hamas terrorist organization) गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या (Israel) हद्दीत हल्ले करत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इस्रायल चांगलाच हादरला आहे. विशेष म्हणजे, शनिवारी रात्रभर इस्त्राएलमध्ये हल्ले सुरुच होते. त्यामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली असून आता मृतांचा आकडा 300 झाला आहे. तर तब्बल 3500 लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर हमासने अनेक इस्त्रायली नागरिकांना ओलीस ठेवले तर काही जणांच्या हत्या केल्याचेही समोर आले आहे. यानंतर इस्त्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी व्हिडिओ संदेश जारी करत हमासला या कृत्याची जबर किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला होता.

Israel Rocket Attack : 200 हून अधिक बळी, 500 जखमी,असंख्य इस्रायली नागरिक ओलीस

शनिवारी सकाळी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून रॉकेट हल्ला केला. इस्त्रायलच्या हद्दीत दोन तासांत 5,000 हून अधिक रॉकेट डागण्यात आले. अनेक दहशतवाद्यांनीही घुसखोरी केली. इस्त्रायल सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर यांनी शनिवारी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. या हल्ल्यात आतापर्यंत किमान 300 हून अधिक बळी गेले.

इस्त्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितले की देशाच्या दक्षिण भागात लष्कर अजूनही हमासशी लढत आहे. परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. दोन्ही बाजूंनी शनिवारी रात्रभर हल्ले सुरुच होते. त्यामुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.  सध्या येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ला; दहशतवाद्यांचा पोलीस स्टेशनवर कब्जा; स्टेट वॉर घोषित

नेतान्याहूंवर टीका

हमासच्या हल्ल्याने नेतन्याहू आणि त्यांच्या युतीतील अन्य नेत्यांवर तीव्र टीका होऊ लगाली. नियोजन आणि समन्वयाच्या पातळीवर हमासच्या हल्ल्याचा अंदाज लावण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल राजकीय विश्लेषकांनी टीका केली. हमासने केलेल्या अभूतपूर्व रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशातील जनतेला सांगितले की, आम्ही युद्धात आहोत. हमासने मोठ्या प्रमाणात रॉकेट डागल्यानंतर आणि दक्षिण इस्रायलमध्ये अतिरेक्यांची घुसखोरी यानंतर नेतन्याहू यांनी आपल्या दूरचित्रवाणी भाषणात हे सांगितले.

Exit mobile version