हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ला; दहशतवाद्यांचा पोलीस स्टेशनवर कब्जा; स्टेट वॉर घोषित

  • Written By: Published:
हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ला; दहशतवाद्यांचा पोलीस स्टेशनवर कब्जा; स्टेट वॉर घोषित

Rocket Attack On Israel : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. गाझा स्थित हमास संघटनेने (Hammas) इस्रायलवर पाच हजारांहून अधिक रॉकेट डागले आहेत. यामुळे इस्रायलने (Israel) संतप्त होऊन युद्धाची घोषणा केली आहे. अमेरिकेने इस्रायलला पूर्ण पाठिंबा दिला असून, हमासने विशेषतः दक्षिण आणि मध्य इस्रायलला लक्ष्य केले आहे यात 10 इस्रायली सैनिकांनाचा मृत्यू झाला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर सरकारकडून नागरिकांना सुरक्षित स्थळांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे सीमाभागातील काही गावांत दहशतवाद्यांनी घुसखोरी करत पोलीस ठाण्यावर कब्जा मिळवल्याचे सांगितले जात आहे.हमासच्या दहशतवाद्यांकडून आतापर्यंत 5000 हजार रॉकेट डागण्यात आली असून, या हल्ल्याला ऑपरेशन अल अक्सा स्टॉर्म असे नाव देण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी 9 वाजता हा हल्ला करण्यात आला आहे.

“मी पुण्याचा सहपालकमंत्री; आढावा बैठक घेणारच” : अजितदादांचाच डाव चंद्रकांतदादा त्यांच्यावरच खेळणार

गाझामधून इस्रायलवर झालेला हा पहिला हल्ला नाही. गेल्या वर्षीही गाझामधून इस्रायलवर रॉकेट डागण्यात आले होते. आज झालेल्या हल्ल्यानंतर  लष्कराकडून गाझा पट्टीतून अनेक दहशतवादी इस्रायलच्या हद्दीत घुसल्याचे सांगण्यात आले. इस्रायलची आपत्कालीन सेवा एजन्सी मॅगेन डेव्हिड अडोम – यांनीही या हल्ल्याबाबत निवेदन जारी केले आहे.

पंतप्रधान सुरक्षा यंत्रणांसोबत घेणार बैठक 

हमास संघटनेकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यांनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयातून एक निवेदनही जारी करण्यात आले असून, पंतप्रधान सुरक्षा प्रमुखांसोबत लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Asian Games : नागपुरच्या पठ्ठ्यानं भेदलं तिरंदाजीत ‘सुवर्ण’; वाचा कोण आहे ओजस देवतळे

मोठी किंमत मोजावी लागेल

या हल्ल्यानंतर इस्रायलकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आपण स्टेट वॉरसाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर हमास दहशतवादी संघटनेला या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा संरक्षण दलाने दिला आहे.

नेमका वाद काय?

इस्त्रायल आणि गाझा यांच्यातील वाद या ठिकाणी किमान 100 वर्षांपासून सुरू आहे. वेस्ट बँक, गाझा पट्टी आणि गोलन हाइट्स यांसारख्या भागांवरून हा वाद आहे. पूर्व जेरुसलेमसह या भागांवर पॅलेस्टाईनचा दावा आहे. त्याचवेळी इस्रायल जेरुसलेमवरील आपला दावा सोडायला तयार नाही. याच मुद्द्यांवरून या ठिकाणी वेळोवेळी वादाची ठिणगी पडत असते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube