Israel Force Kills Mohammed Al Jabari : गेल्या नऊ महिन्यापासून इस्त्रायली (Israel) सैन्य बदल्याच्या आगीत होरपळत आहे. दरम्यान, आता इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादच्या शस्त्रास्त्र निर्मितीचे उपप्रमुख मोहम्मद अल-जाबरीची (Mohammed Al Jabari) हत्या केल्याची माहिती समोर आली. इस्रायली वृत्तपत्र द जेरुसलेम पोस्टनुसार, आयडीएफने (Israeli Defense Forces) शुक्रवारी आपल्या ऑपरेशन आणि जाबरीच्या मृत्यूची माहिती दिली. गेल्या चार दिवसांत इस्रायलचे हे तिसरे मोठे यश आहे.
हिजबुल्लाचा कमांडर फुआद शुकर मंगळवारी लेबनॉनमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात ठार झाला. यानंतर बुधवारी रात्री तेहरानमध्ये हमास नेता इस्माईल हनियाचीही हत्या करण्यात आली. इस्रायलने या दोन्ही कारवायांवर मौन पाळले आहे, मात्र हानिया आणि शुकर या दोघांचाही इस्रायली सैन्याच्या मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश होता.
इस्रायली सैन्याने शुक्रवारी सकाळी सांगितले की आयडीएफने पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादच्या मोहम्मद अल-जाबरीला गुप्तचर ऑपरेशनमध्ये ठार केले. आयडीएफचा दावा आहे की, अल-जाबरीने उत्तर गाझामध्ये इस्लामिक जिहादसाठी शस्त्रे तयार करण्यासाठी निधीची व्यवस्था केली होती. जाबरीने हमाससाठी रॉकेट तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
30 दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावाही इस्रायलने केला
आयडीएफच्या 162 व्या तुकडीच्या सैनिकांनी गेल्या 24 तासांत रफाहमध्ये केलेल्या लष्करी कारवाईत सुमारे 30 दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावाही केला आहे. आयडीएफने सांगितले की, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सैन्याने गुप्त ऑपरेशन केले. या काळात जमिनीवरील हल्ल्यांसोबतच हवाई हल्लेही करण्यात आले. IDA च्या 16 व्या ब्रिगेडच्या सैनिकांनी मध्य गाझामध्ये कारवाई करताना दहशतवादी बोगद्याचा ठावठिकाणा शोधला. बोगद्याचा शोध घेतल्यानंतर इस्रायली हवाई दलाने आत उपस्थित दहशतवाद्यांना ठार केले. इस्रायली लष्कराने सांगितले की, बोगद्याच्या आत अनेक स्फोटक उपकरणे आणि शस्त्रे होती.
अटकपूर्व जामीन फेटाळताच पूजा खेडकर दुबईला पसार?, अटकेच्या भीतीने फरार झाल्याची चर्चा
दरम्यान, गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायली लष्कराने गाझावर हल्ला केला होता. इस्रायली हवाई हल्ले आणि जमिनीवरील कारवाईमुळे गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या युद्धात आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून लाखो लोक बेघर झाले आहे.