Download App

Israel Hamas War : युद्ध भडकणार! इराणने इस्त्रायलला दिली खुली धमकी

Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. युद्धाचा आज अकरावा दिवस आहे. या युद्धात इस्त्रायली नागरिक आणि पॅलेस्टिनी यांच्यासह अनेक विदेशी नागरिकांचा या युद्धात बळी गेला आहे. युद्ध अजूनही थांबलेले नाही आता तर जास्त चिघळण्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत.

इस्त्रायलने गाझा शहरात सैन्य घुसवल्यास आम्हीही यु्द्धात उतरू शकतो, असा इशारा इराणने दिला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) यांचा इस्त्रायल दौरा नक्की झाला असून ते उद्या (बुधवार) इस्त्रायलमध्ये दाखल होतील. या भेटीत बायडेन इस्त्रायलचे (Israel) पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचीही भेट घेणार आहेत. सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीत बायडेन यांचा हा दौरा अतिशय महत्वपूर्ण मानला जात आहे.

बायडेन यांनी मारली पलटी?

या युद्धादरम्यान सोमवारी अमेरिकेचा सूर काहीसा बदललेला दिसला. बायडेन यांनी हमासचा नायनाट करणे आवश्यक असल्याचे म्हटले खरे पण, दुसरीकडे त्यांनी टू स्टेट सॉल्यूशन यांवर देखील भाष्य केले. पॅलेस्टिनी राष्ट्राचा मार्ग मोकळा झाला पाहिजे. इस्त्रायलने गाझाचा ताबा घेतला तर तीम मोठी चूक ठरेल. मात्र, हमासला हाकलून देणेही गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

Israel Palestine War : गाझातील नागरिकांना 3 तासांची डेडलाईन; इस्त्रायलने नेमकं काय केलं ?

रशियाचीही इस्त्रायलला धमकी

या युद्धात अमेरिका इस्त्रायलच्या बाजूने युद्धात उतरला असून मदतही सुरू केली आहे. त्यामुळे इस्त्रायलचं बळ वाढलं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचा कट्टर शत्रू रशिया विरोधात भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इस्त्रायलने गाझावर जमिनीवरून हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. त्यामुळे हे युद्ध अधिकच चिघळत चालले आहे.

एक हजारांपेक्षा जास्त भारतीय सुखरूप घरी

युद्धग्रस्त इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप भारतात आणण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेत ऑपरेशन अजय (Operation Ajay) सुरू केले. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 471 भारतीयांना सुखरुप मायदेशात आणण्यात आले. इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन अजय (Operation Ajay) सुरू केले आहे. भारत सरकारकडून यासाठी खर्च करण्यात येत आहे. या विमानांतून आलेल्या भारतीयांना तिकीटाचे पैसे आकारलेले नाहीत. युद्धग्रस्त इस्त्रायलमधून भारतात येण्यासाठी तेल अवीव शहरातील विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे. इस्त्रायलमधून जे भारतीय परतत आहेत त्यात मोठी संख्या विद्यार्थ्यांची आहे.

Israel Palestine Conflict : …म्हणून अमेरिका इस्त्रायलच्या पाठीशी उभी, जाणून घ्या अमेरिका अन् ज्यू कनेक्शन

Tags

follow us