Israel ban on Antonio Guterres : इस्त्रायल आणि लेबनॉनमधील युद्ध आता इराणकडे (Iran Israel War) सरकलं आहे. इस्त्रायली सैन्याने हिजबुल्ला चीफ हसन नसरल्लाहचा खात्मा केल्यानंतर इराण चांगलाच भडकला. त्यानंतर इराणने (Israel Lebanon Conflict) इस्त्रायलवर बॅलेस्टिक मिसाइल डागून मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर इस्त्रायलही (Iran Attack) खवळला असून जोरदार प्रत्युत्तराची तयारी करण्यात येत आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी इराणला परिणाम भोगण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, या घडामोडी घडत असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांना (Antonio Guterres) देशात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. इस्त्रायलच्या या निर्णयाने जगालाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्री काट्ज यांनी सांगितले की मागील वर्षातील ऑक्टोबर महिन्यात ज्यावेळी हमास आणि इराणने आमच्यावर हल्ला केला त्यावेळी गुटेरेस यांनी या हल्ल्याची साधी निंदा देखील केली नव्हती. त्यामुळे आता त्यांना आमच्या देशात येण्याचा काहीच अधिकार नाही. आमचा देश संयुक्त राष्ट्र प्रमुखांच्या पाठिंब्या शिवायही नागरिकांचं संरक्षण करील यात काहीच संशय नाही, असे काट्ज यांनी ठणकावून सांगितले.
Iran Israel War : मोठी बातमी! युद्ध भडकले, इराणचा इस्रायलवर मिसाईल हल्ला
परराष्ट्र मंत्री काट्ज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात म्हटले आहे की कुणीही व्यक्ती जर इराणने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्याची साधी निंदाही करू शकत नसेल तर त्याला इस्त्रायलच्या जमिनीवर पाऊल ठेवण्याची त्याची लायकी नाही. यून महासिचव हिजबुल्ला, हूती, हमास आणि आता इराणच्या दहशतवाद्यांचे समर्थन करत आहेत असा आरोप इस्त्रायलने केला आहे.आमचा देश एंटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रांवर एक डाग याच रुपात आठवणीत ठेवील. युएनच्या मदतीशिवाय आम्ही आमच्या देशवासियांचं रक्षण करू शकतो. यासाठी आम्हाला गुटेरेस यांची काहीच गरज नाही.
इस्त्रायलचा लेबनॉन आणि इराणबरोबर तणाव वाढलेला असताना गुटेरेस म्हणाले होते की लवकरात लवकर युद्धविरामाची घोषणा करायला हवी. मी मिडल ईस्टमधील वाढत्या तणावाला तत्काळ थांबवले जावे असे आवाहन करतो.
दरम्यान, मंगळवारी इराणने इस्त्रायलवर मोठा हल्ला केला होता. इस्त्रायली सैन्य दल आयडीएफने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, इराणकडून इस्रायलच्या दिशेने मिसाईल डागण्यात आले. आम्ही होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे योग्य प्रकारे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. IDF इस्त्राईल राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे आणि करत राहील असे या ट्विटमध्ये म्हटले होते.
Iran Israel Conflict : इस्त्रायलवरील हल्ला इराणला भोवणार; कठोर निर्बंधांचा अमेरिकी प्लॅन तयार