Download App

रातोरात हजारो इस्त्रायली सैनिक लेबनॉनमध्ये घुसले; हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले

मंगळवारी मध्यरात्री इस्त्रायली सैनिक थेट लेबनॉनच्या हद्दीत घुसले आहे. हजारो सैनिक रातोरात लेबनॉनमध्ये घुसले आहेत.

Israel Lebanon Conflict : इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यातील तणाव (Israel Lebanon Conflict) अजूनही निवळलेला नाही. हिजबुल्ला संघटनेच्या प्रमुखाचा खात्मा केल्यानंतर इस्त्रायल अधिक आक्रमक (Israel Lebanon War) झाला आहे. आता थेट आरपारची लढाई इस्त्रायलने सुरू केली आहे. मंगळवारी मध्यरात्री इस्त्रायली सैनिक थेट लेबनॉनच्या हद्दीत (South Lebanon) घुसले आहे. हजारो सैनिक रातोरात लेबनॉनमध्ये रणगाडे, रॉकेट लाँचर घेऊनच घुसले आहेत.

इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे की दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबु्ल्लाची ठिकाणे आणि अन्य ठिकाणांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले. इस्त्रायलच्या या कारवाईने अरब जगतात मात्र खळबळ उडाली आहे. विशेषतः इराणला या कारवाईचा जास्तच धक्का बसला आहे. इस्त्रायलवरील हल्ल्यांमागे इराणच असल्याचा संशय इस्त्रायलला आहे. हमास आणि हिजबुल्ला या संघटना इराणच्या मदतीनेच मोठ्या झाल्याचा आरोपही इस्त्रायलकडून सातत्याने केला जात आहे.

मोठी बातमी : इस्त्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा म्होरक्या ठार; इस्त्रायली सैन्यानं केलं कन्फर्म!

सध्या इस्त्रायलचे सैनि दक्षिण लेबनॉनमध्ये दाखल झाले आहेत. येथील सुरुंगांमध्ये हिजबुल्लाच्या लोकांचा त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. आयडीएफने सध्या याच सुरंगांना टार्गेट केले असून शोधमोहिम सुरू केली आहे. इस्त्रायली सैन्याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे.

यात म्हटले आहे की दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या दहशतवादी ठीकाणांची गुप्त आणि अचूक माहिती आम्हाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मर्यादीत आणि टारगेटेड ग्राउंड ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. लेबनॉनच्या सीमेलगत असणाऱ्या गावांना लक्ष्य करण्यात येत आहे. कारण काही ठिकाणे अशी आहेत जी धोकादायक ठरू लागली आहेत. यासाठी वायू सेनेची मदत घेतली जात असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हिजबुल्लाचा म्होरक्या ठार

इस्त्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्ला (Israel Attack) संघटनेचा प्रमुख हसन नरसल्लाह (Israel Lebanon Conflict) तीन दिवसांपूर्वी मारला गेला. इस्त्रायल डिफेन्स फोर्सने (IDF) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरील पोस्टमध्ये या घटनेची माहिती दिली होती. हमासनंतर हिजबुल्लाचा खात्मा (Israel Hamas War) करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलला हे मोठं यश मिळाल्याचं मानलं जात आहे. इस्त्रायली सैन्य दलाचे प्रवक्त्यांनी हिजबुल्ला प्रमुख मारला गेल्याची माहिती दिली होती.

follow us