Israel Palestine War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Palestine War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. युद्धाचा आज नववा दिवस आहे. या युद्धात इस्त्रायली नागरिक आणि पॅलेस्टिनी यांच्यासह अनेक विदेशी नागरिकांचा या युद्धात बळी गेला आहे. आतापर्यंत युद्धात 4500 नागरिकांचा बळी गेला आहे. तर या संघर्षात 12 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
Israel Palestine War : युद्ध चिघळलं! पुतिन यांची इस्त्रायलला धमकी; गाझावर हल्ले केल्यास..
इस्त्रायलने या युद्धात आता आधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. गाझा शहराचा ताबा घेण्यासाठी आणि गाझा पट्टी उद्धवस्त करण्यासाठी 10 हजार सैन्य पाठविण्याची योजना आखण्यात आली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्रायली लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. 2006 च्या लेबनॉन युद्धानंतरचं हे सर्वात मोठं युद्ध असेल असे या अहवालात म्हटले आहे.
या युद्धात अमेरिका इस्त्रायलच्या बाजून युद्धात उतरला असून मदतही सुरू केली आहे. त्यामुळे इस्त्रायलचं बळ वाढलं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचा कट्टर शत्रू रशिया विरोधात भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इस्त्रायलने गाझावर जमिनीवरून हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. त्यामुळे हे युद्ध अधिकच चिघळत चालले आहे.
Israel Palestine War : युद्ध चिघळलं! पुतिन यांची इस्त्रायलला धमकी; गाझावर हल्ले केल्यास..
युद्धग्रस्त इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप भारतात आणण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेत ऑपरेशन अजय (Operation Ajay) सुरू केले. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 471 भारतीयांना सुखरुप मायदेशात आणण्यात आले. इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन अजय (Operation Ajay) सुरू केले आहे. भारत सरकारकडून यासाठी खर्च करण्यात येत आहे. या विमानांतून आलेल्या भारतीयांना तिकीटाचे पैसे आकारलेले नाहीत. युद्धग्रस्त इस्त्रायलमधून भारतात येण्यासाठी तेल अवीव शहरातील विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे. इस्त्रायलमधून जे भारतीय परतत आहेत त्यात मोठी संख्या विद्यार्थ्यांची आहे.