Israel Palestine War : युद्ध चिघळलं! पुतिन यांची इस्त्रायलला धमकी; गाझावर हल्ले केल्यास..

Israel Palestine War : युद्ध चिघळलं! पुतिन यांची इस्त्रायलला धमकी; गाझावर हल्ले केल्यास..

Israel Palestine War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Palestine War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर येथील आरोग्य व्यवस्था पूर्ण नष्ट होईल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिलेला आहे. मात्र, इस्त्रायलने याकडे साफ दुर्लक्ष करत जोपर्यंत अतिरेक्यांनी अपहरण केलेले इस्त्रायली नागरिक सुखरूप मायदेशात येत नाहीत तोपर्यंत काहीच सुरू केले जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ‘सार्वमत’ प्रक्रियेकडे सर्वांच्या नजरा; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?

या सगळ्या घडामोडी घडत असताना आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी इस्त्रायलने कठोर शब्दांत इशारा दिला आहे. हमासविरोधात जमिनीवरील मोहीम सुरू करण्यासाठी सैन्य तयार असल्याचं स्पष्ट करत 24 तासांत गाझा सोडण्याचे आदेश इस्त्रायलने तेथील नागरिकांना दिले आहेत. इस्त्रायलच्या इशाऱ्यानंतर येथील 11 लाख लोकांना स्थलांतर करावं लागणार आहे. यानंतर पुतिन यांनी इस्त्रायलला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.

इस्त्रायलच्या जमिनी मोहिमेमुळे अनेक नागरिक मारले जातील. जे अमान्य आहे. इस्त्रालवर अनपेक्षित हल्ला झाला. इस्त्रायलला आपल्या संरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. पण, आता रक्तपात थांबला पाहिजे. इस्त्रायलने गाझावर जमिनी हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे. या युद्धात रक्तपात रशियाला अमान्य आहे. रशिया सगळ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे, असेही पुतिन यांनी स्पष्ट केले.

Israel Palestine Conflict : इस्त्रायलमधील भारतीय सुखरुप घरी येणार; सरकारने सुरू केलं ‘ऑपरेशन अजय’

212 भारतीय सुखरूप परतले 

भारत सरकारने मोठा निर्णय घेत ऑपरेशन अजय (Operation Ajay) सुरू केले. या मोहिमेंतर्गत 212 भारतीयांना युद्धग्रस्त इस्त्रायलमधून सुखरुप मायदेशात आणण्यात आले. युद्धग्रस्त इस्त्रायलमधून भारतात येण्यासाठी तेल अवीव शहरातील विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे. इस्त्रायलमधून जे भारतीय परतत आहेत त्यात मोठी संख्या विद्यार्थ्यांची आहे. इस्त्रायलमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की युद्ध सुरू झालं तेव्हाच आम्ही सगळे घाबरलो होतो. मात्र, भारतीय दूतावासाने आम्हाला मदत केली. त्यामुळे आमच्याच हिंमत आली. त्यानंतर आज आम्हाला मायदेशात परत येता आलं याचा आनंद आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube