Moon Misson Isro : भारताची पुन्हा चंद्र मोहिम; जपानलाही सोबत घेऊन जाणार…

Moon Misson Isro & Jaxa : भारतासोबत आता जपानही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे. इस्त्रो(Isro) आणि जपानच्या जाक्सा(JAXA) संस्थेमध्ये 2019 साली चंद्राची मोहिम आखण्यात आली होती. त्यानूसार जपानची जाक्सा(JAXA) संस्था इस्त्रोच्या मदतीने चंद्रावर रोव्हर पाठवण्यासाठी एका रोव्हरची निर्मिती करीत आहे. या मोहिमेत भारत लॅंडर करणार असून JAXA लॉंचिगचं काम करणार आहे. त्यामुळे आथा भारतासोबत जपानही […]

Moon Mission

Moon Mission

Moon Misson Isro & Jaxa : भारतासोबत आता जपानही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे. इस्त्रो(Isro) आणि जपानच्या जाक्सा(JAXA) संस्थेमध्ये 2019 साली चंद्राची मोहिम आखण्यात आली होती. त्यानूसार जपानची जाक्सा(JAXA) संस्था इस्त्रोच्या मदतीने चंद्रावर रोव्हर पाठवण्यासाठी एका रोव्हरची निर्मिती करीत आहे. या मोहिमेत भारत लॅंडर करणार असून JAXA लॉंचिगचं काम करणार आहे. त्यामुळे आथा भारतासोबत जपानही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार आहे.

Asian Games 2023 : अदितीने रचला इतिहास! ‘गोल्फ’मध्ये पदक जिंकणारी पहिलीच भारतीय

जपानच्या नवीन H3 रॉकेटचा वापर करून 2025 पूर्वी हे मिशन सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे. रोव्हरची सध्या चाचणी केली जात असून रोव्हरची डिझाईनही अंतिम टप्प्यात पोहचली आहे. ही चाचणी रोव्हर चंद्रावरील आपलं प्रमुख उद्दिष्टे पूर्ण करू शकते की नाही हे निर्धारित करणार आहे.

रमेश कदम यांच्या आरोपांवर भुजबळांचा पलटवार, ‘त्यांना ब्लॅकमेल शब्दाचा अर्थ माहीत नसेल’

पाण्याचीही चाचणी होणार :
रोव्हर ‘लुपेक्स प्रकल्प चंद्रावरील पाण्याचे प्रमाण आणि गुणवत्तेची तपासणी करणार असून भविष्यात चंद्रावर मानवी वसाहती स्थापन करण्यासाठी हा डेटा आधार म्हणून वापरण्याची आम्हाला आशा आहे. हा रोव्हर स्वयंचलित असून पाण्याचा शोध घेणार आहे. नमुने गोळा करण्यासाठी ते चंद्राच्या पृष्ठभागावर ड्रिल करण्यास देखील सक्षम असणार आहे.

शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारणार शिवछत्रपतींचे सुवर्णमंदिर, जगातील सर्वात मोठा पुतळा

मोहिमेत ड्रिलिंगद्वारे काढलेल्या नमुन्यांचे रोव्हरमध्ये बसवलेल्या उपकरणांद्वारे संशोधन केलं जाणार असून या मोहिमेत इतर संस्थांकडूनही सायन्स पेलोड पाठवण्यात येणार आहे. नासाचे न्यूट्रॉन स्पेक्ट्रोमीटर ध्रुवावरील पृष्ठभागाच्या 3.3 फूट खाली हायड्रोजनचा शोध घेणार तर युरोपियन स्पेस संस्थेचे एक्सोस्फेरिक मास स्पेक्ट्रोमीटर पृष्ठभागावरील वायूंचा दाबाचे निरीक्षण करणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असू शकते, असे यापूर्वीच्या अनेक संशोधनातून दिसून आले आहे.

चंद्रावर याआधीही रशिया, अमेरिका आणि चीनने पाऊल ठेवलं आहे. या तिन्ही देशांनंतर आता भारतानेही चंद्रावर पाऊल ठेवत तिरंगा फडकावला आहे. तसेच दक्षिण ध्रुवावर ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे.

Exit mobile version