Joe biden Cancer : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe biden) यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याचं समोर आलंय. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. 2015 साली बायडेन यांच्या मुलाचाही कर्करोगामुळेच मृत्यू झाला होता. त्यानंतर आता बायडेन यांनाही कर्करोगाचे निदान झाल्याने बायडेन कुटंबिय चिंतेत आहे.
सबक ऐसा सिखाऐंगे इनकी पीढीया याद रखेगी; भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडीओ शेअर
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकदरम्यानही जो बायडेन यांची प्रकृती हा चर्चेचा विषय ठरला होता. काही दिवसांपासून बायडेन यांना मुत्रनलिकेचा त्रास उद्भभवत होता. त्यानंतर त्यांना विविध चाचण्या करण्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. चाचण्यांच्या अहवालानूसार बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी बायडेन यांचा मुलगा ब्यू बायडेन याचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्याला ग्लायोब्लास्टोमा नावाच्या मेंदुच्या धोकादायक कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यावेळी त्याचं वय 46 होते. आता बायडेन यांनाही प्रोस्टेट कर्करोग झाल्याने बायडेन कुटुंबिय चिंतेत आहे.
राज्याला वादळी पावसाचा तडाखा! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; छत्री घेऊनच बाहेर पडा
जो बायडेन 2021 ते 2024 दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ते 82 वर्षांचे असून राष्ट्राध्यक्षपदाच्या शेवटच्या काळात त्यांचं वय आणि प्रकृतीच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात होती. ऐन निवडणुकीच्या तीन महिन्यांपूर्वी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. बायडेन यांच्याजागी कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत अमेरिकेच्या जनतेने बायडेन यांना नाकारले त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले.
राष्ट्राध्यक्षदाच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी जो बायडेन यांचे वाढते वय आणि कमकुवत स्मरणशक्ती यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. बायडेन बोलताना अडखळतांना तर, कधी पडताना दिसले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले. याशिवाय NATO समिटमध्ये त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना पुतिन असे संबोधले होते, इतकेच नव्हे तर, उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे नावही बायडेन विसरले आणि त्यांना ट्रम्प असे संबोधले होते. त्यामुळेच बायडेन यांचे वाढते वय आणि मानसिक आरोग्य हा निवडणुकीचा मुद्दा बनवण्यात विरोधक सतत मग्न होते.