ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी ‘या’ सवयी महत्त्वाच्या! डॉक्टरांचा सल्ला काय, जाणून घ्या

Reduce risk of breast cancer or any Cancer : छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी, प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) आता या जगात नाही. प्रियाने केवळ 38 वर्षांत कर्करोगाशी (Cancer) लढता लढता अखेरचा श्वास घेतला. प्रियाच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. काही काळापासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. कमी वयात कर्करोगासारख्या गंभीर आजाराने तिचा जीव घेतला. कॅन्सरसारख्या आजाराबद्दल त्यानंतर बरीच चर्चा आता सुरू आहे.
कमबॅकनंतर अभिजीत सावंतची दमदार कामगिरी; तुझी चाल तुरु तुरुचा 15 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार!
अलिकडच्या काळात कमी वयात कर्करोग (Cancer) होण्याची प्रकरणे वाढत चालली आहेत. त्यातच भारतातील महिलांना स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) होण्याचा धोका सर्वाधिक आहे. म्हणूनच या लेखात स्तनाच्या कर्करोगाविषयी महत्त्वाची माहिती आणि उपाययोजना आज जाणुन घेऊया…
सत्तेची पोळी भाजली! मराठा आरक्षणाच्या ‘जीआर’वरून रोहित पवारांनी सरकारलं घेरलं, आंदोलकांची फसवणूक…
स्तनाचा कर्करोग – प्राणघातक
स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) सर्वांत सामान्य व प्राणघातक कर्करोग आहे. जागरूकतेमुळे भारतातील जवळपास 76 टक्के स्तनाच्या कर्करोगाच्या केसेसचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग म्हणजे कर्करोगाची गाठ स्तनात किंवा जवळच्या लिम्फ नोड्समध्ये आढळते. या टप्प्यात ही गाठ शरीराच्या इतर भागात पसरलेली नसते. कर्करोगाची गाठ 0 ते 1, 2 किंवा 3 टप्प्यामधील असू शकते. पण यशस्वी उपचारानंतर देखील स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) पुन्हा होण्याचा धोका हा मोठा चिंतेचा विषय आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अर्ली ब्रेस्ट कॅन्सर (ईबीसी)चे निदान झालेल्या जवळपास 20 टक्के महिलांना 10 वर्षांच्या आत पुन्हा स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. कर्करोगाची जोखीम समजून घेणे आणि पुढील उपाययोजनांबाबत स्पष्ट जाणीव असणे हे स्तनाचा कर्करोगामधून वाचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
एसटीच्या जमिनींच्या विकासात श्रमिक संघटनांचा सहभाग आवश्यक – महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
अर्ली ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी उपाय
सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या संचालिका डॉ. सेवंती लिमये एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या, “तुमचे वैयक्तिक आरोग्य समजून घेऊन तुम्ही स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) होण्याची शक्यता कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकता. त्याचसोबत महिलांनी दीर्घकाळापर्यंत आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सक्रिय पावले उचलली पाहिजेत”. ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कमी करण्यासाठीचे 5 उपाय पुढीलप्रमाणे-
1. योग्य वजन आणि सक्रिय जीवनशैली राखा.
2. नियमित व्यायामाची सवय लावा.
3. वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्या.
4. मानसिक व भावनिक आरोग्य उत्तम राखण्याला प्राधान्य द्या.
5. तंबाखू व मद्यापासून पूर्णपणे दूर राहा.
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी कर्णधार दुखापतीमुळे बाहेर
स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) होण्याचा धोका वास्तविक आहे, पण दक्षता आणि आरोग्याचा व्यापक दृष्टिकोन यांद्वारे कर्करोग होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. महिलांनी यासाठी त्यांच्या जीवनशैलीच्या निवडींबाबत सक्रिय राहायला हवे. तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्याला प्राधान्य द्यायला हवे.