‘ए वेडे, तुझं घर मला…’ प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहेरेची भावनिक पोस्ट, आठवणींनी डोळे पाणावले

Prarthana Behere Emotional Post After Priya Marathe Death : मराठी मनोरंजनसृष्टीवर दु:खाचं सावट पसरलं आहे. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) यांचं कॅन्सरशी झुंज देत असताना निधन झालं. प्रेक्षकांना मालिकांमधून व नाटकांमधून आपलंसं करणाऱ्या प्रियाच्या (Entertainment News) जाण्याने चाहत्यांसह कलाविश्वातील सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) हिने आपल्या खास फेसबुक पोस्टमधून प्रियासोबतच्या नात्याच्या आठवणींना उजाळा दिला.
ती माझ्यासाठी…
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने आपल्या खास फेसबुक पोस्टमधून भावनिक शब्दांत आपली वेदना व्यक्त केली, ‘ए वेडे, प्रिया, पियू, परी, प्री… ती माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हती, ती माझी खरी मैत्रीण होती. आम्ही एकत्र घर शेअर केलं, मॅगी, भुर्जी, कॉफी हे आमचं छोटंसं जग होतं. पहिल्या दिवसापासून तिनं मला आपलंसं वाटू दिलं.’
पुढील 3 दिवस धोक्याचे! राज्यात धो-धो पाऊस; IMD चा इशारा, अनेक जिल्ह्यांना अलर्ट
अजूनही डोळ्यासमोर
प्रियाच्या आजारपणातही दोघींनी घालवलेला वेळ प्रार्थनाने आठवला. एकदा तिची तब्येत थोडी सुधारली, तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती. आम्ही तिघींनी – मी, प्रिया आणि शाल्मली – एकत्र खूप सुंदर वेळ घालवला. तेव्हा तिनं मला सांगितलं, ‘तुझं घर, तुझं वातावरण, तुझे कुत्रे… मला heal करतायत.’ तिच्या डोळ्यांतला आनंद अजूनही डोळ्यासमोर आहे.
पुढील 3 दिवस धोक्याचे! राज्यात धो-धो पाऊस; IMD चा इशारा, अनेक जिल्ह्यांना अलर्ट
प्रार्थनाने पुढे लिहिलं, कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण तिचं मन आणि आत्मा आजार हरवू शकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तिनं जगायला आणि हसवायला शिकवलं. आज ती आपल्यात नाही, पण तिचं हास्य, तिचं तेज आणि आपले क्षण कायम स्मरणात राहतील. प्रियाच्या निधनामुळे मराठी मनोरंजन क्षेत्राने एक हसतमुख, जिव्हाळ्याची आणि प्रतिभावान अभिनेत्री गमावली आहे. तिच्या आठवणी प्रेक्षक आणि मित्रपरिवाराच्या हृदयात कायम जिवंत राहतील.