ब्रेकिंग! आझाद मैदान तातडीने रिकामं करा, मुंबई पोलिसांची मनोज जरांगेंना नोटीस, आंदोलनाला परवानगी नाकारली

ब्रेकिंग! आझाद मैदान  तातडीने रिकामं करा, मुंबई पोलिसांची मनोज जरांगेंना नोटीस, आंदोलनाला परवानगी नाकारली

Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला आता पोलिसांचा आडकाठीचा फतवा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी नियमभंग आणि न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. मैदान तातडीने (Maratha Protest Permission) रिकामं करण्याचा आदेश दिला आहे.

अटी-शर्तींचं पालन न झाल्याने

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आंदोलन सध्या आझाद मैदानावर सुरू आहे. परंतु, पोलिसांच्या नोटीसमुळे या आंदोलनाची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयीन आदेशानुसार आंदोलनाच्या परवानगीसाठी ठरवलेल्या अटी-शर्तींचं पालन न झाल्याने मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे आंदोलन आता कायदेशीर अडचणीत सापडले आहे.

मराठा आरक्षणाचा पेच सुटणार? सरकारच्या गोटात ‘या’ चार पर्यायांची चर्चा, अंतिम तोडगा कोणत्या मार्गाने

गोळ्या घातल्या तरी…

याच दरम्यान, जरांगे यांनी आपली ठाम भूमिका पुन्हा स्पष्ट करताना म्हटलं होतं की, “फडणवीस यांनी गोळ्या घातल्या तरी आम्ही आरक्षणाशिवाय जाणार नाही.” या आक्रमक भूमिकेमुळे आंदोलकांचा उत्साह वाढला होता. पण आता पोलिसांची नोटीस आल्यानंतर वातावरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत.

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस; कोर्टाच्या आदेशानंतर आंदोलक मुंबईबाहेर जाणार का? सरकारसमोर मोठं आव्हान

आज पुन्हा न्यायालयात सुनावणी

जरांगे पाटील यांची तब्येत सलग उपोषणामुळे खालावत आहे. तरीही आंदोलन मागे हटण्याची चिन्हं दिसत नाहीत. पोलिसांच्या कारवाईनंतर पुढे जरांगे आणि त्यांच्या समर्थकांचा काय निर्णय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणावर आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोर्टाचा निर्णय जरांगे यांच्या आंदोलनावर आणि सरकारच्या पुढील भूमिकेवर महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे, राज्य सरकार सामंजस्याने तोडगा काढण्याची तयारी दाखवत असतानाच, पोलिसांची कारवाई आणि आंदोलनकर्त्यांची आक्रमक भूमिका यामुळे संघर्ष आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube