‘का लिहितात लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट?…’; प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले रानडे भावनिक

Mugdha Godbole Ranade’s emotional post after Priya Marathe’s death : मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं (Priya Marathe) आज (31 ऑगस्ट) सकाळी निधन झालं. वयाच्या केवळ 38 व्या वर्षी कॅन्सरशी लढा देत त्यांनी अखेरची श्वास घेतला. मागील वर्षभरापासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. प्रियाच्या निधनानंतर तिच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पोस्ट तिच्या अनेक आजी-माजी सहकलाकारांकडून केल्या जात आहेत. त्यातच लेखिका, अभिनेत्री मुग्धा गोडबोले-रानडे यांनी प्रियाच्या आठवणीत तयार केलेली पोस्ट सर्वांना विचार करायला भाग पाडणारी आहे.
घडामोडींना वेग! मंत्री छगन भुजबळ पुन्हा मैदानात, OBC ची बैठघ घेत केली मोठी घोषणा
अनेकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया
‘पवित्र रिश्ता’ मालिकेमध्ये प्रिया मराठेने अंकिता लोखंडेच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला नकारात्मक छटा होती. मात्र याच कालावधीमध्ये प्रियाला कॅन्सरचं निदान झालं आणि तिला मालिका सोडावी लागली. मात्र तिने मालिका सोडताना केलेल्या पोस्टवर अनेकांनी तिच्या मनाचा विचार न करता वाटेल त्या भाषेत प्रितिक्रिया नोंदवलेल्या. याच गोष्टीची आठवण सांगताना मुग्धा गोडबोले रानडे यांनी लोक इतक्या वाईट कमेंट्स का करतात? असा सवाल विचारत भावनिक पोस्ट केली आहे.
तु्म्ही चारवेळा मुख्यमंत्री, जबाबदारी असताना का नाही निभावली?, विखे पाटलांचा पवारांवर थेट वार
काय वाटलं असेल तिला?
पोस्टमध्ये अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडे लिहितात की, ‘जुलै 2023 मध्ये प्रियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ‘प्रकृतीच्या कारणामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकेतून मी बाहेर पडते आहे.’ चॅनेलनेही आपल्या ऑफिशिअल पेजवरून तो व्हिडिओ शेअर केला. प्रियाला कॅन्सर झाला होता. तरीही ती काही काळ शूटिंग करत होती पण ती त्या ट्रीटमेंटमुळे थकत होती. त्या मालिकेत ती नकारात्मक भूमिका करत होती. त्याचा परिणाम म्हणून असेल, पण त्या व्हिडिओ खाली अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स लिहिल्या होत्या. इथे उच्चारता येणार नाहीत अश्या. काय वाटलं असेल तिला?’ असा प्रश्न मुग्धा गोडबोले रानडे यांनी उपस्थित केला आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पंडीत रसराज महाराजांच्या हनुमान चालीसा पठणाचे आयोजन
का लिहितात लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट?
पुढे पोस्टमध्ये मुग्धा गोडबोले रानडे म्हणतात की, ‘प्रिया गेली. दोन वर्ष झगडून थकली. त्याबद्दल अतोनात दुःख आहे. फार कमी गोष्टींनी मी इतकी अस्वस्थ होते. एरवी तशी मी टगी आहे. पण प्रिया फार गोड मुलगी होती. फार सज्जन. राहून राहून पुन्हा तोच प्रश्न. का लिहितात लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट?’ खिन्न होत मुग्धा यांनी असा प्रश्न पोस्टमधून विचारला आहे. ‘कलाकाराच्या कामाची पावती वगैरे म्हणायला मुळात आता प्रेक्षक इतके भाबडे राहिले आहेत का? कलाकार, त्याचं काम, प्रतिमा यातला फरक न कळण्याइतके?’ असा सवाल मुग्धा गोडबोले रानडे यांनी पोस्टमधून विचारला आहे. ‘स्वतःमधलं काहीतरी घाणेरडं बाहेर काढायचा मार्ग झालाय तो आता. एकानं सुरू केलं की सगळे सुरू होतात. विष पसरत जातं. असो…. प्रिया, फार फार दुर्दैवी घटना,’ असं मुग्धा यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.