Justin Trudeau : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत-कॅनडामध्ये संबंध ताणल्याचं दिसून येत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओ यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे खलिस्तान समर्थकांच्या मुद्द्यावरुन दोन देश एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं दिसून येत आहेत. भारत-कॅनडामध्ये पहिल्यांदाच तणाव निर्माण झाला आहे असं नाही. या आधी भारत आणि कॅनडा अनेकवेळा आमनेसामने आलेले आहेत. अशातच आता जस्टिन ट्रूडो वादविवाद आणि त्याच्या कहाणीची सध्या चर्चा सुरु आहे.
NCP News : ‘पडळकरांना जोडे मारा, एक लाख मिळवा’; अजित पवार गटाची घोषणा
जस्टिन ट्रूडो कोण आहे?
जस्टिन ट्रुडो हे कॅनडाचे 23 वे पंतप्रधान आहेत. त्याचे पूर्ण नाव जस्टिन पियरे जेम्स ट्रूडो आहे. ट्रुडो यांचा जन्म 25 डिसेंबर 1971 रोजी झाला. त्याचे वडील पियरे इलियट ट्रूडो आणि आई मार्गारेट ट्रूडो यांच्या तीन मुलांपैकी तो सर्वात मोठा आहे.
जस्टिन ट्रूडो यांनी मॅकगिल विद्यापीठात साहित्याचा अभ्यास केला. तर 1994 मध्ये त्यांनी कला विषय घेऊन पदवी प्राप्त केली. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात त्यांनी आपले उर्वरित शिक्षण पूर्ण केले. येथूनच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली आणि ट्रूडोने व्हँकुव्हरमध्ये फ्रेंच, गणित आणि इतर विषय शिकवण्यात अनेक वर्षे घालवली.
Women’s Reservation Bill लागू झाल्यावर महाराष्ट्रात 16 महिला खासदार तर विधानसभेत किती महिला असणार?
2007 मध्ये राजकीय प्रवास :
जस्टिनचा राजकीय प्रवास 2008 मध्ये सुरू झाला जेव्हा त्याने लिबरल पक्षाच्या तिकिटावर पापिनौ मतदारसंघातून निवडणूक जिंकली. यानंतर ते 2011, 2015, 2019 आणि 2021 मध्ये पुन्हा निवडून आले.
जस्टिन ट्रुडो यांची एप्रिल 2013 मध्ये लिबरल पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. 19 ऑक्टोबर 2015 रोजी, ट्रूडो यांनी त्यांच्या पक्षाला देशभरातील प्रत्येक प्रांत आणि प्रदेशात विजय मिळवून दिला. त्यांनी 4 नोव्हेंबर 2015 रोजी कॅनडाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांनी वयाच्या 43 व्या वर्षी हे पद स्वीकारले आणि कॅनडामध्ये या पदावर जाणारे ते दुसरे सर्वात तरुण व्यक्ती ठरले. त्यानंतर 21 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांनी लिबरल पक्षाचे नेतृत्व करून दुसऱ्यांदा निवडणुकीत विजय मिळवला. तर तिसऱ्यांदा 20 सप्टेंबर 2021 रोजी जस्टिनने पुन्हा एकदा पक्षाच्या निवडणुका जिंकल्या.
‘वाचाळवीरांवर कारवाई करा नाहीतर..,’; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा
घटस्फोटाचा निर्णय :
काही दिवसांपूर्वीच जस्टिन ट्रुडो यांनी लग्नाच्या 18 वर्षानंतर अचानक त्यांची पत्नी सोफीपासून वेगळं होण्याची घोषणा केली. यासंदर्भात जस्टिनसह त्यांची पत्नीने इन्स्टाग्रामवर घटस्फोटाची माहिती दिली. पोस्टमध्ये ते म्हणाले, ‘बर्याच चर्चेनंतर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. नेहमीप्रमाणे, आम्ही एक कुटुंब राहू. प्रेम आणि आदर या भावनेने आपण एकमेकांसाठी जे काही केले आहे, ते भविष्यातही करत राहू. पंतप्रधानांची हीच पोस्ट त्यांच्या पत्नी सोफीनेही त्यांच्या अकाऊंटवरून शेअर केली होती.
कंपनीवर कारवाई होण्यापासून रोखल्याचा आरोप :
जस्टिन ट्रूडो आणि त्यांच्या प्रतिनिधींनी बांधकाम कंपनीविरुद्ध भ्रष्टाचाराच्या खटल्यात कारवाई होण्यापासून रोखल्याचा आरोप एका संस्थेने केला आहे. SNC-Lavalin Group In नामक कंपनीवर खटला सुरु होता. असं करुन पंतप्रधानांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप वॉचडॉगच्या आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
महिलेविरुद्ध अपशब्द :
आपल्याच देशातल्या एका महिलेबद्दल अपमानास्पद विधान केल्याप्रकरणी जस्टिन ट्रूडो यांना माफी मागावी लागली होती.