Download App

ब्रेकिंग : कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार; पुढचं टार्गेट मुंबई; बिश्नोई गँगची धमकी

Kapil Sharma : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Written By: Last Updated:

Firing at Kapil Sharma’s Canada cafe, 2nd incident in a month : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) कॅनडातील कॅफेमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात देखील या कॅफेवर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कारमध्ये बसलेले काही लोक कॅफेच्या दिशेने गोळीबार करताना दिसत आहेत.

माहितीनुसार, गोल्डी ढिल्लन नावाच्या एका गुंडाने आणि लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. गोल्डी ढिल्लन याने सोशल मीडिया पोस्टद्वारे दावा केला आहे की हा हल्ला त्याच्या टोळीने केला आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, कॅनडातील सरे येथे काही दिवसांपूर्वी कपिल शर्माने कॅप्स कॅफे (Kaps Cafe) नावाचा कॅफे सुरु केला होता. या तर आता या कॅफेवर पुन्हा एका गोळीबार झाला आहे. गोल्डी ढिल्लन आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे.

तर दुसरीकडे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक पोस्ट देखील लिहिण्यात आली आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, “जय श्री राम, ससश्रीअकाल. सर्वांना राम राम. गोल्डी ढिल्लन आणि लॉरेन्स बिश्नोई टोळी आज कपिल शर्माच्या “कॅप्स कॅफे”, सरे येथे झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. आम्ही त्यालाफोन केला, मात्र, त्याने फोन रिसिव्ह केला नाही म्हणून आम्हाला कारवाई करावी लागली. जर त्याने फोन रिसिव्ह केला नाही तर पुढील कारवाई मुंबईत करणार असं या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारने निवडणूक आयोगाचा वापर केला; आमदार जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

तर दुसरीकडे 10 जुलै रोजी देखील कॅप्स कॅफेवर गोळीबार करण्यात आला होता. तेव्हा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. हरजीत सिंग लड्डी हा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट आहे.

follow us