India-Canada Tension: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची कॅनडामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येचा कट भारताने रचला असल्याचा सनसनाटी आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Prime Minister Justin Trudeau) यांनी केला आहे.. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधात कटूता निर्माण झाली. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या राजदुतांची हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, आता कॅनडातील ‘सिख फॉर जस्टिस’ संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याने भारतीयांना धमकावत त्यांना कॅनडा सोडण्याचे फर्मान सुनावले.
पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हरदीप सिंग निज्ज याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळं दोन्ही देशांतील संबंध बिघडले. दरम्यान, भारतीयांना धमकावतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ‘सिख फॉर जस्टिस’ (SFJ) या खलिस्तान समर्थक संघटनेने कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना धमकी दिली आहे आणि त्यांना लवकरात लवकर देश सोडण्यास सांगितले आहे.
Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर
पन्नूचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात तो तो कॅनेडियन भारतीयांना लवकरात लवकर कॅनडा सोडून भारतात जाण्यास सांगत आहे. व्हिडीओमध्ये दहशतवादी पन्नू, भारतीय, हिंदूनो कॅनडा सोडा; भारतात जा. तुम्ही फक्त भारतालाच पाठिंबा देत नाही, तर खलिस्तान समर्थक शिखांचे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचं समर्थन करताय, असं म्हणतांना ऐकू येत आहे.
https://x.com/sukh_randhawa14/status/1704104550632767781?s=20
या व्हिडिओमध्ये पन्नू म्हणाला की, निज्जर याच्या हत्येचा आनंद साजरा करून तुम्ही हिंसाचाराचे समर्थन करत आहात. कॅनेडियन शीखांना 29 ऑक्टोबर रोजी व्हँकुव्हर येथे होणाऱ्या तथाकथित सार्वमतामध्ये मतदान करण्याचे आवाहनही त्याने केले. खरं तर भारताने SFJ प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांना दहशतवादी घोषित केले आहे.
दरम्यान, आता दोन्ही देशामधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची दोन्ही देशांनी हकालपट्टी केल्यानंतर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कॅनडामधील भारतीय नागरिकांसाठी काय करावे याचे निर्देश दिले आहे. या अॅडव्हायझरीत म्हटलं की, कॅनडातील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या माफ केलेले द्वेषपूर्ण गुन्हे आणि गुन्हेगारी हिंसाचार पाहता, तिथल्या सर्व भारतीय नागरिकांना आणि तिथं अंतर्गत प्रवास करू इच्छिणाऱ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आव्हान केले.