Kolkata murder: बांग्लादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार (Anvarul Azim Anar Murder Case) यांची हत्या केल्यानंतर मृतदेहाजवळ बसून आधी दारु पिलो, त्यानंतर रात्रभर मृतदेहाचे तुकडे करत असल्याची कबुली कसाई जिहाद्याने दिलीयं. बांग्लादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार हे वैद्यकीय उपचारासाठी भारतात आले होते. मात्र दुसर्याच दिवसापासून ते बेपत्ता होते.अन्वारुल अझीम अनार १२ मे रोजी कोलकाता येथे पोहोचले, त्याच्या दुसर्याच दिवशी ते बेपत्ता झाले. त्यांची कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं.
Gabh Movi: रेड्याने जुळवली लग्नगाठ ‘गाभ’ चित्रपटातून नवी जोडी लवकरच रुपेरी पडद्यावर
पश्चिम बंगाल सीआयडी आणि ढाका पोलिसांच्या माहितीनुसार, कोलकात्ताच्या फ्लॅटवर खासदाराची हत्या केल्यानंतर मृतदेहाच्या जवळच बसून दारु प्यायलो. त्यानंतर संपूर्ण शरीराचे रात्रभर तुकडे केले होते. सकाळी कसाई जिहाद्याने खासदाराचेच कपडे घालून इमारतीच्या बाहेर पडला होता. सदार अन्वारुल अझीम यांचा मृतदेह कापणारा कसाई जिहाद हवालदार याची बांगलादेश पोलीस आणि बंगाल सीआयडीने चौकशी केली आहे. यामध्ये त्याने अनेक खुलासे केले आहेत. फ्लॅटवर तो आधीच उपस्थित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
दोन महिन्यांपूर्वीच खासदार अझीम यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. युएसमधील बांग्लादेशी नागरिक अख्तरऊज जमान यांनी हत्येचा कट रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वीच बांग्लादेशच्या खुलनामधून हत्या करण्यासाठी कसाई जिहाद हवालदार याला आयात करण्यात आलं होतं. या हत्येमागे एका महिलेचाही अॅंगल अधिकाऱ्यांना मिळाला असून सेलेस्टी रहमान असं या महिलेचं नाव आहे.
पटेलांचा राजीनामा, साताऱ्याला मिळणार आणखी एक खासदार; राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर
सेलेस्टी रहमानला हत्येचा कट रचणाऱ्यांनी हनी टॅप प्रकरणात अडकवण्यासाठी आयात केलं होतं. सेलेस्टीने खासदार अझीम यांच्याशी मैत्री करुन त्यांना फ्लॅटवर घेऊन आली. खासदाराची हत्या झाली तेव्हा सेलेस्टी फ्लॅटमध्ये उपस्थित होती. खासदार अझीम यांना बेडरुममध्ये नेऊन त्यांच्या तोंडावर उशी दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह किचनमध्ये नेऊन कसाई हवालदारने धारदार शस्त्राने मृतदेहाची कातडी सोलली. त्यानंतर मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे केले होते.
तब्बल तीन दिवस आरोपींनी मृतदेहाचे तुकडे टॅक्सीमधून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. या प्रकरणी खुलनामधील कसाई हवालदारला सीआयडीकडून अटक करण्यात आली असून अख्तरऊज जमान यानेच हत्येचा कट रचल्याचं त्याने कबुल केलंय.