ममतांना पहिला धक्का! खासदाराचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणातूनही निवृत्ती

ममतांना पहिला धक्का! खासदाराचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणातूनही निवृत्ती

Kolkata News : कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील महिला डॉक्टर अत्याचार (Kolkata Doctor Case) प्रकरणाने राज्य सरकार पुरतं हादरलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून राज्य सरकारच्याही अडचणी (Kolkata News) वाढू लागल्या आहेत. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचे (TMC) खासदार जवाहर सरकार यांनी (Jawahar Sircar) राजीनामा दिला आहे. या प्रकरणात पक्षाने जी भूमिका घेतली त्यावर जवाहर सरकार यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. राज्याच्या मु्ख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा पहिला (Mamata Banerjee) मोठा धक्का मानला जात आहे.

Kolkata Doctor Case : कामावर परत या कारवाई होणार नाही : डॉक्टरांना सुप्रीम कोर्टाचं आश्वासन

जवाहर सरकार यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एक पत्र लिहिले. राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनाम्याबरोबरच राजकारणातूनही संन्यास घेत असल्याचे त्यांना या पत्रात नमूद केले आहे. जवाहर सरकार माजी आयएएस अधिकारी आहेत. पक्षातील नेत्यांचा एक वर्ग भ्रष्टाचारात सहभागी आहे. या लोकांविरुद्ध काहीच कारवाई होत नाही. राजीनामा देण्यामागे हेच सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

आरजी कर रुग्णालयात (RG Kar Hospital) घडलेल्या भयावह घटनेनंतर मला असं वाटत होतं की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करतील. पण असं काहीच झालं नाही. आता सरकारकडून जी कार्यवाही केली जात आहे ती पुरेशी नाही तसेच ही कार्यवाही खूप उशिराने होत असल्याचे सरकार यांनी सांगितले. मला वाटतं की भ्रष्टाचारी चिकित्सकांवर वेळीच कारवाई झाली असती तर राज्यातील परिस्थिती इतकी चिघळलीच नसती असेही सरकार यांनी या पत्रात म्हटले आहे.

कोलकाता डॉक्टर बलात्कार अन् हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; पीडितेच्या पालकांचा पोलिसांवर गंभीर आरोप

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube