Download App

Video: मक्का, मदिना शहर हाय अलर्टवर, सौदीत पावसाचा हाहाकार!

Saudi Arabia Rainfall: सौदी अरेबियात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले असून मक्का, मदिना आणि

  • Written By: Last Updated:

Saudi Arabia Rainfall: सौदी अरेबियात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले असून मक्का (Mecca), मदिना (Medina) आणि जेद्दामध्ये (Jeddah) अनेक गाड्या वाहून गेले आहे. माहितीनुसार, सौदी अरेबिया (Saudi Arabia) मुसळधार पावसामुळे अचानक आलेला पूर, भीषण वादळ आणि गारपिटीशी झुंज देत आहे. त्यामुळे सौदी अरेबिया हाय अलर्टवर असून मुसळधार पाऊस आणि वादळाची स्थिती बुधवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक गाड्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहे. सध्या या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक गाड्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे सौदी अरेबियाच्या हवामान खात्याने मक्का, मदिना आणि जेद्दाह शहरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

2009 मध्ये आलेल्या पुरात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि त्यांच्याद्वारे जारी केलेल्या अपडेटवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

जोरदार वाऱ्याचा इशारा

गल्फ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाच्या हवामान खात्याने जाझान शहर आणि फरासन बेटावर जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे ज्यामुळे कमी दृश्यमानता आणि उंच लाटा येण्याची शक्यता आहे. जेद्दाह आणि सौदी अरेबियाच्या इतर भागात मुसळधार पावसाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

महायुतीत मनसेची एन्ट्री शिंदेंच्या आडमुठ भूमिकेमुळे फिस्कटली; कार्यकर्त्यांचं ठाकरेंसमोर खळ्ळखट्याक

follow us