मुलांनो सोशल मीडिया वापरायचाय? आधी पालकांची परवानगी घ्या; सरकार कायदाच करणार
Children Social Media Account : लहान मुलांना सोशल मीडियावर अकाऊंट तयार (Social Media) करण्यासाठी आणि ते चालविण्यासाठी आता आई वडिलांची परवानगी आवश्यक राहणार आहे. यासाठी केंद्र सरकार लवकरच नियम तयार करणार आहे. डाटा प्रोटेक्शनच्या नव्या ड्राफ्टमध्ये आहे. या ड्राफ्टनुसार लहान मुलांचे सोशल मीडिया अकाऊंट तयार करण्याआधी कंपन्यांना त्यांच्या माता पित्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. डाटा वापराआधी ही मंजुरी घ्यावी लागणार आहे. म्हणजेच जोपर्यंत पालकांची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत कंपन्या मुलांचा डाटा वापर किंवा स्टोर करू शकणार नाही.
18 फेब्रुवारी नंतर देणार अंतिम रूप
डिजिटल व्यक्तिगत डेटा सुरक्षा नियमांचा मसुदा सरकारने तयार केला आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास कोणत्याही कारवाईचा उल्लेख केलेला नाही. संसदेने जवळपास 14 महिन्यांपूर्वी डेटा सुरक्षा विधेयक 2023 ला मंजुरी दिली होती. यानंतर मसुदा नियम जारी केले आहेत. लोकांच्या शिफारसी घेण्याच्या उद्देशाने हे नियमांचा मसूदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुदा नियमांना अंतिम रूप देण्याचा विचार 18 फेब्रुवारी नंतर केला जाईल.
Sharvari Wagh: अल्फाच्या शेड्यूलपूर्वी शर्वरीने इंटरनेटवर घातला धुमाकूळ; पहा जबरदस्त अदा
डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण अधिनियम 2023 मधील कलम 40 चे उप कलम 1 आणि 2 च्या अधिकारांचा वापर करून केंद्र सरकार अधिनियम लागू करण्याची तारीख किंवा त्यानंतर तयार करण्यात येणाऱ्या प्रस्तावित नियमांचा मसुदा प्रकाशित केला जातो. मसुदा नियमात डिजिटल डेटा संरक्षण अधिनियम 2023 अंतर्गत सहमती घेणे, डेटा प्रसंस्करण संस्था आणि अधिकाऱ्यांच्या कामकाजाशी संबंधित तरतुदी केल्या आहेत.
mygov वेबसाईटवर मसुदा उपलब्ध
या मसुदा नियमांवर 18 फेब्रुवारी नंतर विचार केला जाणार आहे. मसुदा नियमात डीपीडिपी अधिनियम 2023 अंतर्गत दंडाचा उल्लेख केलेला नाही. नियमांत व्यक्तींकडून परवानगी घेण्यासाठीच्या एका व्यवस्थेबाबत सांगण्यात आलं आहे. लहान मुलांशी संबंधित डाटाचा वापर करण्यासाठी त्यांच्या पालकांची सहमती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा मसुदा वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
भारतीयांना इंटरनेटचं वेड! दिवसातले पावणे सात तास ऑनलाइन; रिपोर्टमधून खुलासा