‘या’ दिवशी पुन्हा प्रदर्शित होणार वीर-ज़ारा, सौदी अरेबिया, ओमान आणि कतारमध्येही स्क्रिनिंग

  • Written By: Published:
‘या’ दिवशी पुन्हा प्रदर्शित होणार  वीर-ज़ारा, सौदी अरेबिया, ओमान आणि कतारमध्येही स्क्रिनिंग

Veer-Zara Re-Released : वीर-ज़ारा या सुपरहिट चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण होत असल्याने प्रेक्षकांना पुन्हा एका वीर-ज़ारा (Veer-Zara) चित्रपट मोठ्या स्किनवर पाहता येणार आहे. वीर-ज़ारा 20व्या वर्धापन दिनानिमित्त 7 नोव्हेंबरपासून 600 स्क्रीनवर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

यावेळी हा चित्रपट सौदी अरेबिया, ओमान आणि कतारमध्येही स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. वीर-ज़ाराचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी केले आहे. वीर-ज़ारा ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात आयकॉनिक चित्रपटांपैकी एक आहे.

या चित्रपटामध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) , प्रीती झिंटा (Preity Zinta) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने तेव्हा भारत आणि जगभरात सर्वाधिक कमाई केली होती. री-रिलीजमध्ये अमेरिका, कॅनडा, यूएई, सौदी अरेबिया, ओमान, कतार, बहरीन, कुवैत, यूके, आयर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी, सिंगापूर, मलेशिया आणि दक्षिण आफ्रिका अशा मोठ्या बाजारातही ही फिल्म प्रदर्शित केली जाणार आहे.

या री-रिलीज प्रिंट्समध्ये पहिल्यांदाच ‘ये हम आ गये है कहां’ हे गाणे देखील समाविष्ट करण्यात आला आहे. रिलीजच्या वेळी या चित्रपटामधून हे गाणे वगळले गेले होते. वीर-ज़ारा ला जगभरात एक मोठा फॅन बेस आहे आणि या 20 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही हा चित्रपट पुन्हा रिलीज करत आहोत, जेणेकरून चाहते जगभरात ही प्रेमकहाणी पुन्हा अनुभवू शकतील.

विधानसभेच्या रणधुमाळीत सुप्रीम कोर्टाचा अजितदादांना 36 तासांचा अल्टिमेटम; वाचा नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर वाढता उत्साह, तसेच जगभरातील फॅन्सचे रिक्वेस्ट पाहून यशराज फिल्म्सने हा निर्णय घेतला आहे. हा पाऊल आमच्या फॅन्ससाठी एक खास भेट आहे. अशी माहिती माध्यमांशी बोलताना नेल्सन डिसूझा यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube