मोठी बातमी! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात हत्या, अफगान मीडियाचा दावा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातच हत्या झाल्याचा दावा केला जातोय. तशी अफवा वाऱ्यासारखी पसरली आहे.

News Photo   2025 11 26T160030.630

मोठी बातमी! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात हत्या, अफगान मीडियाचा दावा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातच हत्या झाल्याचा दावा केला जातोय. (Pakistan) तशी अफवा वाऱ्यासारखी पसरली आहे. पाकिस्तानी सरकार आणि तुरुंग प्रशासनाने संगनमत करून इम्रान खान यांचा छळ करून त्यांची हत्या केल्याचा दावा केला जातोय. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे 2023 सालापासून रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात कैद आहेत. सध्या मात्र त्यांची तुरुंगात हत्या केल्याची अफवा पसरली आहे.

पाकिस्तानी लष्कर आमि जेल प्रशासनाकडून त्यांचा छळ केला जातोय. त्यांना कोणालाही भेटू दिले जात नाहीये. त्यामुळेच इम्रान खान यांच्या हत्येच्या अफवेला बळ मिळाले आहे. मंगलवारी रात्री (25 नोव्हेंबर) इम्रान खान यांच्या बहिणी नोरीन खान, अलिमान खान, उजमा खान यांना तुरुंग परिसरातून फरफटत बाहेर काढण्य्त आले. त्यांना मारझोडही करण्यात आल्याचा दावा केला जातोय. परंतु इम्रान खान यांना कोणालाही भेटू दिले जात नाहीये. त्यामुळेच इम्रान खान यांची हत्या केल्याची अफवा पसरली आहे.

मोठी बातमी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांचा तुरूंगवास

पाकिस्तानात इम्रान खान यांची हत्या करण्यात आल्याचा दावा काहीजण करत आहेत. या दाव्यामुळे पाकिस्तानत संगळीकडे खळबळ उडाली आहे. इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. इम्रान खान जिवंत असतील तसेच त्यांना काहीही झालेले नसेल तर मग त्यांच्याशी कोणालाही भेटू का दिले नाहीये? असा सवाल पीटीआयच्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावर नेटकरी पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर सडकून टीका करत आहेत.

इम्रान खान यांच्या हत्येचा दावा एक्सवरील मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स बलुचीस्तान नावाच्या खात्यावरदेखील इम्रान खान यांच्या हत्येचा दावा करण्यात आलाय. ऑगस्ट 2023 पासून इम्रान खान हे तुरुंगात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी सरकारने इम्रान खान यांना कोणालाही न भेटू देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळेच इम्रान खान यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. काहीजण इ्रमान खान यांची हत्या झाल्याचाही दावा करत आहेत. हा दावा खरा असल्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

 

Exit mobile version