Video : विधेयक फाडले अन् संसेदत करू लागली Haka डान्स, महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

Hana-Rawhiti : न्यूझीलंडची सर्वात तरुण खासदार हाना-राहीती (Hana-Rawhiti) पुन्हा एका सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. गुरुवारी, न्यूझीलंडच्या

Hana Rawhiti

Hana Rawhiti

Hana-Rawhiti : न्यूझीलंडची सर्वात तरुण खासदार हाना-राहीती (Hana-Rawhiti) पुन्हा एका सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. गुरुवारी, न्यूझीलंडच्या संसदेत (New Zealand Parliament) त्यांनी एका अनोख्या पद्धतीने ब्रिटन आणि माओरी यांच्यातील कराराशी संबंधित विधायकाला विरोध केला आहे. त्यांनी या विधेयकाला इतका विरोध केला की त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी गुरुवारी विधायकाला विरोध करत हाका डान्स केला.

गुरुवारी ट्रीटी प्रिन्सिपल्स बिलावर (Treaty Principles Bill) मतदान करण्यासाठी न्यूझीलंडच्या संसेदत खासदार जमले तेव्हा  22 वर्षीय  हाना-राहीती यांनी पारंपारिक माओरी हाका डान्स करत बिलाची प्रत फाडली. सभागृहातील इतर सदस्य आणि गॅलरीत बसलेले प्रेक्षक हाना-रावहिती करियारिकी मॅप्पी-क्लार्कसह हाका डान्स करू लागले, ज्यामुळे सभापती गेरी ब्राउनली यांनी सभागृहाचे कामकाज थोडक्यात तहकूब केले.

काय होता बिल ?

1840 चा वैतांगीचा करार सरकार आणि माओरी यांच्यातील संबंधांना मार्गदर्शन करतो. यामध्ये आदिवासी गटांना ब्रिटीश प्रशासनाकडे सत्ता सोपविण्याच्या बदल्यात त्यांची जमीन टिकवून ठेवण्याचे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे व्यापक अधिकार मिळतात. हे अधिकार सर्व न्यूझीलंडवासियांना लागू होतील असं बिल सरकारकडून आण्यात येत आहे.

तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या दोनशे वर्षांच्या इतिहासातील हाना या सर्वात तरुण खासदार ठरल्या आहेत. तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या दोनशे वर्षांच्या इतिहासातील हाना या सर्वात तरुण खासदार ठरल्या आहेत. 2023 च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणादरम्यान संसदेत पारंपारिक हाका डान्स त्यांनी केला होता.

माझी बदनामी करण्यासाठी दिल्लीवरून चार एजन्सी आणल्यात, भरसभेत डॉ. अतुलबाबा भोसले कडाडले

त्यांनी 2023 च्या निवडणुकीत संसदेत सर्वाधिक काळ खासदार राहिलेल्या नानिया माहुता यांचा पराभव केला होता. हे जाणून घ्या की, हाका हे एक युद्धगीत आहे, जे पूर्ण शक्तीने आणि भावनेने सादर केले जाते.

Exit mobile version