Microsoft AI New CEO : मायक्रोसॉफ्ट (Microsoft) ही तंत्रज्ञान विश्वातली दिग्गज कंपनी आहे. आता या कंपनीनंआपल्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक व्यवसायासाठी मुस्तफा सुलेमान (Mustafa Suleiman) यांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केलं. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नाडेला यांनी मंगळवारी कंपनीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) उपक्रमाचे सीईओ म्हणून सुलेमान यांना जबाबदारी दिली. त्याची माहिती खुद्द मुस्तफा सुलेमान यांनी स्वतः सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर दिली आहे.
‘फडणवीसांचा रात्री तीन वाजता फोन’; खुद्द मनोज जरांगेंची कबुली
सुलेमान टीम मायक्रोसॉफ्ट एआय प्रोडक्ट प्रदान करेलं. ही टीम Edge, Bingआणि Copilot अशा अनेक मायक्रोसॉफ्ट एआय प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसवर काम करते.
गुगलमध्येही केले काम
मुस्तफा सुलेमान यांनी 2010 मध्ये एआय लॅब डीप माइंड नावाची कंपनी सुरू केली. त्यानंतर 2014 मध्ये ही कंपनी गुगलने विकत घेतली. लॅब डीप माइंड ही मायक्रोसॉफ्टच्या एआयशी स्पर्धा करणाऱ्या प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे.
‘अजितदादांनी खो घातला म्हणूनच..,’; संग्राम थोपटेंचं नाव घेत विजय शिवतारेंचा निशाणा
गुगलने लॅब डीप माइंड कंपनी विकत घेतल्यानंतर सुलेमान यांचा त्या टीमशी काही संबंध नव्हता. यानंतर गुगलसोबत झालेल्या वादामुळे सुलेमान यांनी २०२२ मध्ये कंपनी सोडली. आता ते सत्या नाडेला यांच्या मायक्रोसॉफ्टमध्ये सामील झालेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुस्तफा सुलेमान मायक्रोसॉफ्ट जॉईन केल्यानंतर, आता कंपनी आपल्या टीममध्ये इतर अनेक लोकांना देखील सहभागी करू घेऊ शकते.
वडील टॅक्सी चालवायचे
मुस्तफा सुलेमान यांचा जन्म 1984 साली UK मध्ये झाला. त्याचे वडील सीरियामध्ये टॅक्सी चालक म्हणून काम करत होते आणि आई यूकेमध्ये परिचारिका होती. त्यांचे बालपण गरिबीत गेले. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण थॉर्नहिल प्रायमरी स्कूल, यूके येथून केले. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी विद्यापीठ सोडले. 2010 मध्ये त्यांनी Demis Hassabis सोबत Deep Mind AI कंपनी सुरू केली.