‘अजितदादांनी खो घातला म्हणूनच..,’; संग्राम थोपटेंचं नाव घेत विजय शिवतारेंचा निशाणा

‘अजितदादांनी खो घातला म्हणूनच..,’; संग्राम थोपटेंचं नाव घेत विजय शिवतारेंचा निशाणा

Vijay Shivtare : अजित पवार (Ajit Pawar) यांनी खो घातला म्हणूनच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) विधानसभा अध्यक्ष झाले नसल्याचं सांगत शिदें गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, बारामती लोकसभेसाठी इच्छूक असलेले विजय शिवतारे यांनी आज माजी आमदार अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे. थोपटे यांच्याशी संवाद साधताना त्यांनी लोकसभेसाठी आशिर्वादही मागितले आहेत. शिवतारे यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे.

भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात गाशा गुंडाळला… माणिक कदम यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादीत

विजय शिवतारे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये संग्राम थोपटे यांना मंत्रिपदाची संधी होती पण त्यांना अडवलं गेलं. नंतर प्रदेशाध्यक्षपदाचं मला माहित नाही पण विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसने लेखी स्वरुपात कळवलं होतं. सर्व तयारी झाली होती पण अजित पवारांनी खो घातला म्हणून ते विधानसभा अध्यक्ष झाले नाहीत. कारण पुण्यातला दुसरा कोणी माणूस मोठा होतोयं, अध्यक्ष वर बसणार आणि हे मंत्री खाली बसणार हे अजितदादांना सहन झालं नाही, हे कसंकाय चालेलं म्हणून अजितदादांनी हे होऊ दिलं नाही, अजितदादांनी दोन पिढ्यांचं नूकसान केलं असल्याचाही आरोप विजय शिवतारे यांनी यावेळी बोलताना केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र सरकारमध्ये असतानाही ते स्वतःच्या सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांवर अर्थात अजितदादांवर जाहीरपणे टीका करत होते. बारामतीकरांनी पुरंदरचे काय काय पळवले याची यादीच शिवतारे यांनी त्यावेळी वाचून दाखविली होती. तसेच अजितदादांची पुरंदरची खुमखुमी पुण्यात काढणार असा जाहीर इशाराही त्यांनी दिला होता. अजित पवारही शिवतारे यांच्या विधानसभा निवडणुकीतील जखमेवर खपली जमू द्यायचे नाहीत.

मनसेचा खरा फायदा श्रीकांत शिंदेंना होणार? ठाकरेंना सोबत घेऊन CM शिंदे मुलालाही करणार सेफ

मागच्या वर्षभरापासून राजकीय परिस्थितीमध्ये कमालीचा बदल झाला आहे. अजितदादा आणि विजय शिवतारे हे दोघेही आता महायुतीतच आहेत. तरीही शिवतारे यांनी मात्र आपला आक्रमक बाणा कायम ठेवला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही. आता बदला घेण्याची वेळ आलीय… आता कोणाची गुलामगिरी करणार नाही. वेळ पडली तर स्वतःही लोकसभेला उभा राहणार”, असे आव्हान विजय शिवतारे यांनी अजितदादांना दिलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टेन्शन वाढले आहे. शिवतारे यांच्या या शड्डूला जुन्या वादाची किनार असली तरीही यंदा बारामतीमध्ये शरद पवार यांना पराभूत करायचे असल्याने हा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील अशा सगळ्या नेत्यांनी मध्यस्थी केली. पण शिवतारे माघार घ्यायला तयार नाहीत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube