Download App

अंतराळातून घरावर कचरा पडला! NASA वर 80,000 डॉलर्सचा दावा ठोकला…

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये आपल्या घरावर चंद्रावरुन कचरा घरावर पडल्याने एका कुटुंबाने थेट नासावर गुन्हा दाखल केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी कुटुंबियाने नासाविरोधात 80, 000 डॉलर्सचा दावाच ठोकला आहे.

NASA : अमेरिकेतील (United States) फ्लोरिडामध्ये आपल्या घरावर चंद्रावरुन कचरा घरावर पडल्याने एका कुटुंबाने थेट नासावर (NASA) गुन्हा दाखल केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी नासाविरोधात संबंधित कुटुंबाने $80, 000 डॉलर्सचा दावा ठोकला आहे.

गृहमंत्र्यांवर आरोप केले की भाजपचे लोक नाराज होतात; पुणे अपघात अन् ‘नीट’ पेपर लिकवरून सुप्रिया सुळेंची टीका

नेमकं काय घडलं?
अमेरिकास्थित फ्लोरिडा राज्यातील समनर यांच्या घरावर 8 मार्च 2021 रोजी अंतराळातून 700 ग्रॅम वजनाचा ढिगारा कोसळला. अचानक घरावर ढिगारा कोसळल्याने घराचे छप्पर तुटले. या घटनेदरम्यान, त्यांचा मुलगा डॅनियल घरी होता. सुदैवाने त्याला या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र घराच्या छप्परचे नुकसान झाले, त्यामुळे नासा संस्थेने ही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तक्रारदाराकडून करण्यात आलीयं.

समनर कुटुंबाकडून लॉ फर्म क्रॅनफिल खटला लढत आहेत. घराच्या छतावर ढिगारा पडल्याने त्यांच्या छताला मोठे छिद्र पडले आहेत. या घटनेमुळे समनर कुटुंबाच्या जीवनावर परिणाम झाला असून त्यांना झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी वकील मिका गुयेन वर्थी यांनी केलीयं.

ऊस उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर करणार 40 टक्के वाढणार उत्पादन; शरद पवारांची माहिती

या घटनेमध्ये समनर कुटुंबातील कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, अचानक अशी परिस्थिती ओढावल्यास परिस्थिती धोक्याची ठरु शकते, कोणाचाही मृत्यूही झाला असता, असं वकिलांनी स्पष्ट केलंय.

नासाचं म्हणणं काय?
अंतराळातून पडलेला मलबा हा वापरलेल्या कार्गो पॅलेटचा भाग होता. हा कार्गो पॅलेट 2021 साली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरुन कचरा म्हणून सोडण्यात आला होता. कार्गो पॅलेटने वातावरणात प्रवेश केल्यानंतर तो नष्ट झाला असल्याचं नासाने सांगितलं आहे.

अंतराळात निर्माण होणाऱ्या कचऱ्याला ‘स्पेस डेब्रिज, ऑर्बिटल डेब्रिज’ असं म्हणतात. पृथ्वीभोवती हा पदार्थ फिरत असून हा कृत्रिम पदार्थ उपयुक्त नसतो. मानवाने अवकाशात पाठवलेल्या वस्तूंपासून हा कचरा बनत असून यामध्ये उपग्रहाचे तुकडे, रॉकेटचे तुकडे यांचा समावेश असतो.

follow us