Video : झटका बसला, एका बाजूला कलंडलं; नेपाळमध्ये सौर्या एअरलाईन्सचं विमान कसं क्रॅश झालं?

नेपाळच्या काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात होऊन 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

Letsupp Image   2024 07 24T142731.930

Letsupp Image 2024 07 24T142731.930

Nepal plane crash Video : नेपाळच्या काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात होऊन 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, विमानाचा पायलट जखमी असल्याचे सांगितले जात आहे. घडलेल्या या भीषण अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला असून, नेमकं काय घडलं हे यात दिसून येत आहे.

पुणे म्हाडा’च्या अध्यक्षपदी पुन्हा शिवाजीराव आढळराव पाटील; लोकसभेपूर्वी दिला होता राजीनामा

त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेमकं काय घडलं?

नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सौर्य एअरलाइन्सच्या विमानाने पोखराकडे टेकऑफ केले होते. त्यावेळी अचानक धावपट्टीवर घसरले आणि हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर विमानाने पेट घेतला. त्यामुळे विमानातील क्रू मेंबर्ससह 18 जणांचा मृत्यू झाला. तर, विमानाचा पायलट जखमी झाला आहे. घटनेवेळी विमानात 19 जण प्रवास करत होते. मृत पावलेले सगळे कर्मचारी सौर्य एअरलाईन्सचेच कर्मचारी होते. विमानात एकही प्रवासी नव्हता. कॅप्टन एम. आर. शाक्य विमान चालवत होते. त्यांचा जीव वाचला आहे.

व्हिडिओत काय?

समोर आलेल्या व्हिडिओत सौर्य एअरलाईन्सचे विमान आकाशात झेपावताना दिसून येत आहे. मात्र, अचानक विमान एका बाजूला कलंडले आणि क्रॅश होऊन त्यात भीषण आगा लागल्याचे समोर आलेल्या व्हिडिओत दिसून येत आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बायडेन बाहेर का पडले? जाणून घ्या 5 मोठी कारणे

हवाई सुरक्षेरून नेपाळ टार्गेट

यापूर्वीदेखील नेपाळमध्ये घडलेल्या भीषण विमानांचे अपघात घडले आहेत. त्यामुळे तेथील खराब हवाई सुरक्षा रेकॉर्डवरून नेपाळवर अनेकदा टीका करण्यात आली आहे. 2000 सालापासून नेपाळ आणि परिसरात झालेल्या विमान आणि हेलिकॉप्टर अपघातात सुमारे 350 लोक मरण पावले आहेत.

1992 मध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे एअरबस काठमांडूकडे येत असताना एका टेकडीवर कोसळून भीषण अपघात झाला होता. यात167 लोक ठार झाले होते. तर, अगदी अलीकडेच म्हणजे जानेवारी 2023 मध्ये यती एअरलाइन्स विमानाला झालेल्या अपघातात 72 प्रवाशी ठार झाले होते.

Exit mobile version