Download App

नेपाळमध्ये कहर; मुसळधार पावसामुळे त्रिशूली नदीत दोन बस वाहून गेल्या, 65 जण बेपत्ता

Nepal Weather :  सध्या भारतातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेकांचे हाल होत आहे. तर दुसरीकडे भारताचा शेजारी असणारा नेपाळमध्ये

  • Written By: Last Updated:

Nepal Weather :  सध्या भारतातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेकांचे हाल होत आहे. तर दुसरीकडे भारताचा शेजारी असणारा नेपाळमध्ये (Nepal) देखील मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. नेपाळमधील मदन-आशीर महामार्गावर भूस्खलनामुळे 63 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन बस त्रिशूली नदीत (Trishuli River) वाहून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.  या बसमध्ये सात भारतीयांचाही समावेश होता अशी माहिती समोर आली आहे.

चितवन जिल्ह्यातील नारायणघाट-मुगलिंग मार्गावरील सिमलताल परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी सांगितले की, या दोन्ही बसमध्ये चालकांसह एकूण 63 जण प्रवास करत होते. घटनास्थळी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे मात्र खराब हवामानामुळे बसेसचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत.

इंद्रदेव यादव म्हणाले की, काठमांडूला जाणाऱ्या बसमध्ये 24 जण प्रवास करत होते तर गौरला जाणाऱ्या बसमध्ये 41 जण प्रवास करत होते. काठमांडूला जाणाऱ्या बसमध्ये सात भारतीय नागरिकांचाही समावेश होता. घटनास्थळी नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाचे जवान बचाव कार्यासाठी पोहोचले असून मुसळधार पावसामुळे नारायणघाट-मुगलिंग मार्गावर अनेक ठिकाणी दगड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.  त्यामुळे बचाव कार्य करण्यास प्रशासनाला अडचणी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भारतीयांना विदेशाची भुरळ! एकाच वर्षात भारतीयांची संख्या दुप्पट, गुजरात अव्वल

तर दुसरीकडे गुरुवारी कास्की जिल्ह्यात पावसामुळे भूस्खलन आणि पुरामुळे किमान 11 जणांचा मुत्यू झाला आहे. माहितीनुसार, मान्सूनच्या आपत्तींमुळे नेपाळमध्ये एका दशकात 1,800 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर 400 पेक्षा जास्त लोक बेपत्ता झाले आहे आणि 1,500 हून अधिक लोक जखमी झाले आहे.

मोठी बातमी : दरवर्षी 25 जून ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळला जाणार; मोदी सरकारची घोषणा

follow us

संबंधित बातम्या