भारतीयांना विदेशाची भुरळ! एकाच वर्षात भारतीयांची संख्या दुप्पट, गुजरात अव्वल
Indian Citizens in Foreign Countries : भारतातले गुजरात राज्य असे आहे जेथील (Gujarat) लोक मोठ्या प्रमाणात विदेशात स्थायिक होत आहेत. सन 2021 पासून आतापर्यंत 1187 गुजराती लोकांनी भारत देश सोडला आहे. त्यांच्या दृष्टीने कॅनडा हा पहिल्या प्राधान्याचा देश बनला आहे. शिक्षणाच्या निमित्ताने कॅनडात (Canada) गेलेले लोक नंतर तेथेच स्थायिक झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्स नुसार गुजरातमधील युवक शिक्षणाच्या निमित्ताने कॅनडात जात आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथेच करिअर शोधण्याच्या प्रयत्नात गुंतून पडतात अशी परिस्थिती आहे. याच काळात जर त्यांना कॅनडाची नागरिकता मिळाली तर ते तेथेच स्थायिक होत आहेत. कॅनडाची नागरिकता मिळाल्यानंतर अनेक गुजराती लोकांनी त्यांचे पासपोर्ट सरेंडर केले आहेत.
रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की सन 2021 पासून आतापर्यंत गुजरात राज्यातील 1187 लोकांनी भारतीय नागरिकता सोडून दिली आहे. क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाकडील माहितीनुसार सन 2023 मध्ये 485 पासपोर्ट सरेंडर करण्यात आले. 2022 च्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. यामध्ये बहुतांश लोक 30 ते 45 या वयोगटातील आहेत आणि अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशात राहत आहेत.
देशभरातील आकडेवारीवर नजर टाकली तर सन 2014 ते 2022 या काळात 22 हजार 300 गुजरातमधील नागरिकांनी भारतीय नागरिकता सोडली. ही संख्या दिल्ली 60 हजार 414, आणि पंजाब 28 हजार 117 नंतर तिसऱ्या क्रमांकावरील आहे. कोविड काळानंतर पासपोर्ट सरेंडरचे प्रमाण वाढले आहे.
विदेशात जाणारे बहुतांश युवक शिक्षणाच्या निमित्ताने जात असतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथेच स्थायिक होतात. तसेच काही लोक चांगल्या जीवनमानाच्या विदेशात स्थायिक होत आहेत. निवेशक व्हिसा सल्लागार ललित अडवाणी यांनी सांगितले की व्यापारी चांगल्या पायाभूत सुविधा आणि जीवनशैली साठी विदेशात जात आहेत. सध्या जे लोक भारतात अतिशय चांगले जीवन जगत आहेत ते लोक सुद्धा येथील वाढते प्रदूषण (Air Pollution) आणि खराब रस्त्यांच्या समस्येला कंटाळून विदेशात स्थायिक होण्याचा विचार करत आहेत.
संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की आगामी काळात पासपोर्ट सरेंडर करणाऱ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सन 2012 नंतर विदेशात जाणाऱ्या भारतीय नागरिकांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. जे लोक विदेशात स्थायिक झाले आहेत ते त्या देशाची नागरिकता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Canada : खलिस्तानी हरदीप निज्जरच्या समर्थकांच्या घरावर गोळीबार, भारत-कॅनडा पुन्हा भिडणार?