सावधान! अतिमुसळधार पावसाचा अलर्ट! पुणे, मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना 9 जुलैला सुट्टी

सावधान! अतिमुसळधार पावसाचा अलर्ट! पुणे, मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना 9 जुलैला सुट्टी

पुणे/मुंबई/सातारा : राज्यात मान्सूनच्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारी (Heavy Rainfall) राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. उद्याही पावसाचा मुक्काम (Rain Alert) कायम राहणार आहे. पुणे, मुंबई (Mumbai Rains)आणि सातारा या जिल्ह्यांना 9 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा (Pune Rain) इशारा देण्यात आला आहे. पावसाचा अंंदाज पाहता मंगळवारी पुणे शहरासह जिल्ह्यातील इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यत आली आहे. मुंबईतही मुसळधार पावसाची (Weather Update) शक्यता असल्याने येथेही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द; प्रवाशांचे हाल, मुंबईत मुसळधार पाऊस

सातारा आणि पुणे जिल्ह्यांना मंगळवारी (9 जुलै) अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. पावसाचा अंदाज पाहता सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांना सचेत अॅपद्वारे मोबाइलवर सतर्क राहण्याचे मेसेज पाठवले गेले आहेत. नदीकाठी तसेच दरड कोसळू शकतील अशा भागात राहत असणाऱ्या नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.

नदीनाल्याच्या पूलावरून पाणी वाहत असल्यास पूल पार करू नये. पर्यटनस्थळी धबधबे, धरण परिसर, घाटमाथा या ठिकाणी जाण्याचे टाळावे. वीज चमकत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच अतिवृष्टी दरम्यान जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. तसेच मदतीसाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाचा 1077 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.

Weather Forecast : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात गारपिटीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

follow us
  • fb
  • instagram
  • youtube