Nobel Prize in Physics 2023 : भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर! पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्रॉझ अन् ॲने एलहुइलियर यांच्या नावाची घोषणा

Nobel Prize in Physics 2023 : रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने (The Royal Swedish Academy of Sciences)पियरे अगोस्टिनी(Pierre Agostini), फेरेंक क्रॉझ (Ferenc Krausz)आणि ॲने एलहुइलियर (Anne L’Huillier)यांना भौतिकशास्त्रातील 2023 चे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. पदार्थामधील इलेक्ट्रॉन डायनॅमिक्सच्या अभ्यासासाठी प्रकाशाच्या अ‍ॅटोसेकंद स्पंदन निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतींसाठी यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल देत असल्याचे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ […]

Nobel Award 2023

Nobel Award 2023

Nobel Prize in Physics 2023 : रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने (The Royal Swedish Academy of Sciences)पियरे अगोस्टिनी(Pierre Agostini), फेरेंक क्रॉझ (Ferenc Krausz)आणि ॲने एलहुइलियर (Anne L’Huillier)यांना भौतिकशास्त्रातील 2023 चे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. पदार्थामधील इलेक्ट्रॉन डायनॅमिक्सच्या अभ्यासासाठी प्रकाशाच्या अ‍ॅटोसेकंद स्पंदन निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतींसाठी यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल देत असल्याचे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसनं सांगितले.

नांदेड दुर्घटना! दुरावस्था पाहून खासदार भडकले; डीनच्या हातात मॉप देत शौचालयं साफ करुन घेतलं…

पदार्थामधील इलेक्ट्रॉन डायनॅमिक्सच्या अभ्यासासाठी प्रकाशाच्या अ‍ॅटोसेकंद स्पंदन निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतीच्या शोधासाठी या तीन शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने आज भौतिकशास्त्रील नोबेल पुरस्कार जाहीर केला.

या तिघांमधील एक असणारे पिएरे अगॉस्टिनी हे अमेरिकेमधील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत. तर फेरेंक क्रॉझ हे जर्मनीमधील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ क्वॉंटम ऑप्टिक्स येथे कार्यरत आहेत. अॅने या स्वीडनमधल्या लँड विद्यापीठात प्राध्यापक असल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे सरकारचे दिवाळी गिफ्ट! मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा दुसरा नोबेल आहे. भौतिकशास्त्रातील पहिला नोबेल पुरस्करा एक्स-रेडिएशनच्या संशोधनासाठी विल्हेल्म रोंटगेन यांना दिला आहे. भारतामधील भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण यांना रमन इफेक्टसाठी पहिले नोबेल पारितोषिक दिले. भौतिकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार स्वीडनमधील रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसकडून देण्यात येते.

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार आत्तापर्यंत फक्त चार महिलांना मिळाला आहे. त्यामध्ये मेरी क्युरी यांना 1903 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला तर मारिया गोएपर्ट मेयर यांना 1963 सालचा भौतिकशास्त्रातील नोबेल मिळाला आहे. त्याचबरोबर 2018 सालचा नोबेल डोना स्ट्रिकलँड यांना तर आंद्रिया गेझ यांना 2020 साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

Exit mobile version