North Korea Life : उत्तर कोरियाच्या बाबतीत तुम्ही अनेक अजब अन् चमत्कारिक गोष्टी ऐकल्याच असतील. लोकांनी कसं राहावं, इंटरनेटवर काय पाहावं, कोणते कपडे वापरावेत या सगळ्या गोष्टी सरकार ठरवतं. लोकांच्या जीवनातही इतका हस्तक्षेप कोरियाचं सरकार करतं. या अशा संतापजनक वातावरणात राहणं अनेकांना आवडत नाही. कुणी जर विरोध केला तर शिक्षाही इतकी भयंकर असते की कुणी विरोधाच्या भानगडीत पडत नाही. त्याऐवजी सरळ देशातून पळून जाण्यास प्राधान्य देतात. टिमोथी चो या व्यक्तीने उत्तर कोरियातून पळून (North Korea) जाण्यात यश मिळवलं आणि याच टिमोथी यांनी उत्तर कोरियातील धक्कादायक प्रकार जगासमोर आणले आहेत.
टिमोथी चो यांनी प्रसारमाध्यमांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी उत्तर कोरियातील अनेक धक्कादायक प्रकारांचा उलगडा केला आहे. उत्तर कोरियात टीव्ही खरेदी करण्याची परवानगीच नाही पण तरीही जर तुम्ही एखादा टीव्ही खरेदी केलात तर सरकारचा एक माणूस थेट तुमच्या घरी येईल. हा कर्मचारी ठरविल की टीव्हीवर तुम्ही कोणते कार्यक्रम पाहायचे. हा व्यक्ती घरातील सर्व अँटेना काढून टाकतो. फक्त एक अँटेना ठेवला जातो. याद्वारे फक्त किम जोंग उन यांच्या प्रचार कार्यक्रम पाहिले जाऊ शकतात. जर या गोष्टी तुम्ही पाळल्या नाहीत तर अनेक प्रकारे त्रास दिला जातो. इतकेच नाही तर तुम्हाला तुरुंगाची हवा सुद्धा खावी लागेल.
सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर उत्तर कोरियात टीव्हीवर फक्त किम जोंग उनच्या (Kim Jong Un) प्रचार असणारे कार्यक्रम पाहिले जाऊ शकतात. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही कार्यक्रम पाहणे किंवा सर्च करणे देखील अडचणीचे ठरू शकते.
उत्तर कोरियाने केली नव्या ड्रोनची निर्मिती; पाण्याखाली आणता येणार त्सुनामी
यानंतर चो यांनी आणखी काही अजब नियमांची माहिती दिली. कटींग करण्यासारखी एकदम साधी गोष्टही या देशात राजकीय बनली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांनी एक, दोन किंवा तीन वेगवेगळ्या स्टाइलने डोक्यावरील केस कापावेत असे सांगितले जाते. येथील केस कापणारे दुकानदार देखील याव्यतिरिक्त अन्य पद्धतीने केस कापण्याची हिंमत करत नाहीत.
असे असतानाही जर कुणाची हेयर स्टाईल वेगळी दिसून आली तर तो व्यक्तीच नाही तर त्याचे कुटुंबिय देखील अडचणीत येतात. या मुलाच्या पालकांना पोलीस स्टेशन गाठून जबाब लिहून द्यावा लागतो. यानंतरही मुलांच्या आई वडिलांचा त्रास कमी होत नाही. उत्तर कोरियातील या नियमांचा लोकांना आता प्रचंड त्रास होत नाही. परंतु, त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय सध्या नाही.
उत्तर कोरियातील या आयुष्याचा अनेकांना वीट आला आहे. त्यामुळे देश सोडून जाणाऱ्या लोकांचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. येथील नागरिक देश सोडून जाण्यास कायम तयार असतात. तरीदेखील देश सोडून जाणे वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. सन 1950 पासून आतापर्यंत फक्त 30 हजार लोकांनाच देशातून पळून जाता आले आहे. देशातून पळालेले हे लोक अमेरिका, चीन आणि युरोपातील देशांत जाऊन स्थायिक होतात.
युक्रेनला धक्का! रशिया-उत्तर कोरियात ‘हा’ करार लागू; युद्धात रशियाला मिळणार मदत?