उत्तर कोरियाने केली नव्या ड्रोनची निर्मिती; पाण्याखाली आणता येणार त्सुनामी

  • Written By: Published:
Kim Jong Un

सध्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या युद्धाभ्यास चालू आहे. पण यादरम्यान पुन्हा एकदा उत्तर कोरियाने संपूर्ण जगाला घाबरवले आहे. हुकूमशहा किम जोंग उन यांच्या आदेशानुसार उत्तर कोरियाने शुक्रवारी पाण्याखाली आण्विक हल्ला करणाऱ्या ड्रोनची चाचणी केली, अशी माहिती वृत्तसंस्था केसीएनएने दिली आहे. हे ड्रोन इतके धोकादायक आहे की त्याच्या हल्ल्यामुळे समुद्रात त्सुनामी येऊ शकते. युद्धाच्या काळात शत्रूच्या नौदलाचा नाश करण्याच्या उद्देशाने याचा वापर केला जाऊ शकतो.

वृत्तसंस्था केसीएनएने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार त्यांनी असे म्हटले आहे की कवायती दरम्यान उत्तर कोरियाचे ड्रोन ५९ तासांपेक्षा जास्त काळ पाण्याखाली होते आणि शुक्रवारी त्याच्या पूर्व किनारपट्टीच्या पाण्यात स्फोट झाला. मात्र, ड्रोनच्या आण्विक क्षमतेबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली नाही.

पुतिन यांना अटक झाल्यास भयंकर विध्वंस, माजी राष्ट्रपतींची खुलेआम धमकी

वृत्तसंस्था केसीएनएनच्या माहितीनुसार पाण्याखाली आण्विक हल्ला करणारे ड्रोन कोणत्याही किनार्‍यावर आणि बंदरावर तैनात केले जाऊ शकतात किंवा ऑपरेशनसाठी कोणत्याही पृष्ठभागावरील जहाजातून नेले जाऊ शकतात.

उत्तर कोरियाने पाण्याखाली आण्विक हल्ल्याच्या ड्रोनची चाचणी करण्याव्यतिरिक्त स्वतंत्र गोळीबार कवायती देखील केल्या. यामध्ये अणुहल्ला मोहिम पार पाडण्यासाठी चार क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी अण्वस्त्रे म्हणून चाचणी वॉरहेडसह करण्यात आली आणि त्यांनी 1,500 ते 1,800 किमीचा पल्ला व्यापला.

दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याविरोधात युक्रेनियन मुलांना डिपोर्ट केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालायातून अटक वॉरंट निघाले आहे. पुतिन यांच्याविरोधात वॉरंट निघाल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारण चांगलंच तापलं आहे.

युक्रेनमधल्या मुलांना डिपोर्ट केल्याचा आरोप व्लादिमीर पुतिन यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांच्याविरोधात आता कारवाई म्हणून अटक वॉरंट काढण्यात आले आहे. त्यानंतर माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांच्याकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना होऊ शकते अटक… जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

Tags

follow us