युक्रेनला धक्का! रशिया-उत्तर कोरियात ‘हा’ करार लागू; युद्धात रशियाला मिळणार मदत?

युक्रेनला धक्का! रशिया-उत्तर कोरियात ‘हा’ करार लागू; युद्धात रशियाला मिळणार मदत?

Russia North Korea Defense Treaty : उत्तर कोरियाची वृत्तसंस्था KCNA ने गुरुवारी सांगितले की रशिया आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांमध्ये (Russia North Korea) जून महिन्यात झालेला संरक्षण करार लागू झाला आहे. दोन्ही देशांनी हा करार लागू करण्यासंदर्भातील कागदपत्रे एकमेकांना दिली होती. हा करार दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे रशियाला मोठी मदत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. युक्रेन आणि रशिय यांच्यातील युद्धात रशियाची (Ukraine Russia War) मदत करण्यासाठी उत्तर कोरियाने दहा हजारांपेक्षा (North Korea) जास्त सैनिक पाठवल्याचा आरोप अमेरिका आणि दक्षिण कोरियाने नुकताच केला आहे.

रशिया आणि उत्तर कोरिया या देशांदरम्यान याच वर्षातील जून महिन्यात एक महत्त्वाचा करार करण्यात आला होता. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयाँगमध्ये आयोजित एका शिखर संमेलनात हा करार करण्यात आला होता. 9 नोव्हेंबर रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या (Vladimir Putin) संरक्षण विषयक करारावर सही केली होती. तर 11 नोव्हेंबर रोजी उत्तर कोरियाने देखील या कराराची पुष्टी केली होती.

अमेरिका आणि दक्षिण कोरियाला थेट आव्हान, उत्तर कोरियाने पुन्हा डागली क्षेपणास्त्रे

या करारानुसार दोन्ही देशांतील कोणत्याही एका देशावर हल्ला झाला तर दोन्ही देश एकमेकांना तत्काळ सैन्य मदत उपलब्ध करून देतील. दोन्ही देशांच्या अंतर्गत घडामोडीत दखल न देणे, एकमेकांची सुरक्षा आणि अखंडते विरुद्ध दुसऱ्या कोणत्याही देशाशी करार न करणे या तरतुदींचा यामध्ये समावेश आहे. तसेच दोन्ही देश परमाणू ऊर्जा, व्यापार आणि अंतराळ क्षेत्रातही एकमेकांची मदत करतील.

किमला हवाय युद्धाचा अनुभव

या कराराचा नेमका उद्देश काय आहे यावर जाणकारांनी मते व्यक्त केली आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन अत्याधुनिक (Kim Jong Un) तंत्रज्ञानाच्या मोबदल्यात आपल्या सैनिकांसाठी युद्धाचा अनुभव मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. जून महिन्यात पुतीन यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला होता. या दौऱ्यातच पुतीन यांनी हा करार केला होता.

KCNA च्या रिपोर्ट्स नुसार बुधवारी दोन्ही देशांचे उपपरराष्ट्र मंत्री किम जोंग ग्यू आणि आंद्रेइ रुडेंको यांनी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये महत्वाच्या कागदपत्रांची देवाणघेवाण केली. यानंतर हा करार प्रभावी झाला आहे. मागील महिन्यात रशियाच्या संसदेत या करारासाठी सर्व संमतीने मतदान झाले होते आणि नंतर पुतीन यांनी या करारावर सही केली होती.

युक्रेनवर मोठं संकट! तिजोरीत खडखडाट, सैनिकांच्या पगारालाही पैसे नाहीत; काय घडलं?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube