Helle Lyng : मोदींना प्रश्न विचारणाऱ्या नॉर्वेतील पत्रकाराचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड…

नार्वे दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकार हेले यांचं फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंड डिलीट करण्यात आलंय.

Untitle (19)

Untitle (19)

Helle Lyng : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना प्रश्न विचारणाऱ्या नार्वेच्या महिला पत्रकाराचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंड सस्पेंड करण्यात आले आहे. हेले (Helle Lyng) नार्वेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारणारी महिला पत्रकार हेले चांगलीच चर्चेत आली होती. मला ऑनलाईन विरोधाचा सामना करावा लागत असल्याचं हेले यांनी स्पष्ट केलंय. तसेच यावरुन मी दुखी: नसून प्रश्न विचारण्याची ही छोटीशी किंमत मानली जात असल्याचे हेले यांनी स्पष्ट केलंय.

हेले यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केलीयं. या पोस्टमध्ये हेले यांचं इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्याची नोटीस शेअर केलीयं. यासोबतच त्यांनी फेसबुकचे अकाऊंट डिलीट झाल्याबाबतही सांगितलं आहे. पत्रकारितेच्या स्वातंत्र्यातील ही एक छोटीशी किंमत असून मी पहिल्यांदाच अनुभव घेत असल्याचंही हेले यांनी म्हटलंय. हेले यांनी शेअर केलेली पोस्ट मेटाला टॅग करुन म्हणाल्या की, मी सर्वाधिक भारतीयांना उत्तर देऊ इच्छित आहे, परंतू माझ्या उत्तराला आता उशिर होत आहे. माझं फेसबुक आणि इंस्टा अकाऊंट उघडत नसून मला अपेक्षा आहे की दोन्ही अकाऊंट पुन्हा सुरु होईल.

पंतप्रधान मोदींना प्रश्न! विदेशी गुप्तहेर असल्याची टीका, जगभरात चर्चेत आलेली ‘ही’ पत्रकार महिला कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विविध देशांच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी नुकताच नॉर्वेचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांना नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान, ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यासह संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत असताना एका महिला पत्रकाराने विचारलेला प्रश्न सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे.

गौतम अदानींना अमेरिकेत मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणात सर्व आरोप मागे अन् खटला कायमस्वरूपी बंद

या पत्रकार महिलेने चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारला असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच तिला ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यानंतर या महिला पत्रकारानेही सोशल मीडियावर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्या समवेत संयुक्त निवेदन दिल्यानंतर नॉर्वेची पत्रकार हेले लिंग यांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही जगातील सर्वात मुक्त पत्रकारिता असलेल्या देशातील पत्रकारांचे काही प्रश्न तुम्ही का घेत नाहीत?, असा प्रश्न हेले लिंग यांनी गर्दीतून विचारला. मात्र पंतप्रधान मोदींना सदर प्रश्न ऐकू गेला की नाही?

Exit mobile version