गौतम अदानींना अमेरिकेत मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणात सर्व आरोप मागे अन् खटला कायमस्वरूपी बंद
Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांना अमेरिकेत मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. माहितीनुसार, अमेरिकेच्या
Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांना अमेरिकेत मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. माहितीनुसार, अमेरिकेच्या न्याय विभागाने त्यांच्यावरील रोखे आणि फसवणुकीशी संबंधित खटला कायमस्वरूपी बंद केला असून, त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे अदानी ग्रुपला मोठा दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या खटल्यावर आता अधिक संसाधने खर्च करण्याचा हेतू नाही अशी माहिती न्यायालयात न्याय विभागाने दिली आहे. यानंतर न्यायालायाने अदानी आणि इतर आरोपींवरील आरोपपत्र विथ प्रेज्युडिस म्हणजेच खटला पुन्हा सुरु न करता येण्याजोगी रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे.
आरोप काय?
भारतातील सौर ऊर्जा प्रकल्पांची कंत्राटे मिळवण्यासाठी अदानी ग्रुपने (Gautam Adani) भारतीय अधिकाऱ्यांना अंदाजे 265 दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचा कट रचल्याचा आरोप अमेरिकन संस्थांनी 2024 च्या अखेरीस केला होता. तसेच भांडवल उभारण्यासाठी त्यांनी ही व्यवस्था अमेरिकन गुंतवणूकदार आणि कर्जदात्यांपासून लपवली असल्याचा आरोप देखील अमेरिकन संस्थांनी अदानी ग्रुपवर केला होता. तर दुसरीकडे तपासादरम्यान फिर्यादी पक्षाला न्यायालयात आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे सापडले नाहीत तसेच अमेरिकन संस्थांना कोणताही स्पष्ट अमेरिकन संबंध देखील आढळला नाही.
न्याय विभागाने न्यायालयात काय सांगितले?
न्याय विभागाने या प्रकरणाचा आढावा घेतला आहे आणि अभियोजन पक्षाच्या विवेकाधिकाराचा वापर करुन वैयक्तिक प्रतिवादींवरील या फौजदारी आरोपांवर पुढील संसाधने खर्च केली जाणार नाहीत अशी माहिती या प्रकरणात अमेरिकन न्याय विभागाने न्यायालयात दाखल केलेल्या एका कागदपत्रात दिली आहे. या माहितीनंतर न्यायालयाने हे आरोप कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश दिले आहे.
SEC प्रकरणही निकाली
गेल्या आठवड्यात, अमेरिकेच्या ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन’शी (SEC) संबंधित एका प्रकरणातही तडजोड (निराकरण) करण्यात आली. हे प्रकरण सौर ऊर्जा प्रकल्पांविषयी गुंतवणूकदारांना द्यायच्या माहितीशी (disclosures) संबंधित होते. या तडजोडीच्या अटींनुसार, गौतम अदानी यांनी 6 दशलक्ष डॉलर्स आणि सागर अदानी यांनी 12 दशलक्ष डॉलर्स भरण्यास सहमती दर्शवली.
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर-
या प्रक्रियेदरम्यान, कोणत्याही पक्षाने आपण काहीही चुकीचे केले आहे हे मान्य केले नाही, तसेच त्याचा इन्कारही केला नाही. हा समझोता कायदेशीर प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जातो कारण यामुळे गुंतवणूकदारांमध्ये कंपनीच्या स्थितीबाबत असलेली अनिश्चितता दूर होण्याची अपेक्षा आहे.