Download App

VIDEO पाहा : पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचा भेटीला दहशतवादी !

Paris Olympic Gold Medallist Arshad Nadeem: पाकच्या मरकजी मुस्लिम लीगचे नेते नदीम याची घरी आले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

  • Written By: Last Updated:

Paris Olympic Gold Medallist Arshad Nadeem : पॅरीस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचे खेळाडू अर्शद नदीम ( Arshad Nadeem) याने सुवर्णपदक जिंकले होते. भालाफेकमध्ये नदीम याने 92.97 मीटर भाला फेकला होता. हा ऑलिम्पिक रेकॉर्ड आहे. नदीमने पाकिस्तानसाठी (Pakistan) तब्बल 32 वर्षानंतर वर्षानंतर सुवर्णपदक (Olympic Gold) जिंकल्याने त्याचे जगभर कौतुक होत आहे. बिकट परिस्थितीत सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या नदीमला पाक सरकारकडून बक्षीस देण्यात आले आहे. परंतु आता नदीम याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अमेरिकेने दहशतवादी घोषित केलेल्या व्यक्तीने नदीम याची त्याची घरी भेट घेतली आहे. हे दोघे ही एकमेंकाशी बोलताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओ समोर आल्याने आता अर्शद नदीम वादात अडकण्याची शक्यता आहे. (Olympic Gold Medallist Arshad Nadeem Caught On Camera Meeting Pakistani Terrorist)


तब्बल अकरा वर्षानंतर आसाराम बापू पॅरोलवर जेलमधून बाहेर येणार ! पुण्यात घेणार उपचार

पाकच्या मरकजी मुस्लिम लीगचे नेते नदीम याची घरी आले होते. मरकजी मुस्लिग लीग ही लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेची राजकीय आघाडी आहे. या संघटनेचा युवा अध्यक्ष हॅरिस दार हा नदीच्या आला होता. दार ने लष्कर ए तोयबासाठी पैसे गोळा केल्याचा आरोप आहे. तो मरकजी मुस्लिम लीगचा सहसचिव आहे. नदीम हा मायदेशी परतल्यानंतर ही भेट झाली आहे. आता पाकिस्तानमधील सिक्युरिटी एजन्सीने चौकशी सुरू केली आहे. या दोघांची भेट कधी झाली हे मात्र समजू शकलेले नाही. याबाबत सिक्युरिटी एजन्सीकडे शोध घेण्यात येत आहे.

IPS Officer Transfer : आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोलापूर ग्रामीणला नवे पोलिस अधीक्षक

मरकजी मुस्लिम लीग हा हफिज सईदची असून, तो मुंबई हल्ल्यातील मास्टर माइंड आहे. 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 166 नागरिकांचा मृत्यू झाला होता. लष्कर- ए -तोयबा या संघटनेला अमेरिकेने 2018 मध्ये दहशतवादी संघटना घोषित केली होती. तर मरकजी मुस्लिम लीग 2017 मध्ये सइदने स्थापन केली होती.

follow us