OpenAI : ChatGPIT चे निर्माते OpenAI कडून कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना पदावरून हटवण्यात आले होते. ओपनएआयच्या बोर्डाला ऑल्टमनवर विश्वास राहिलेला नाही. या कारणामुळे त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन (Greg Brockman) यांनीही कंपनीच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता पुन्हा सॅम ऑल्टमन हे OpenAI च्या सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रूजू होणार आहेत. हे प्रकरण नेमकं काय पाहूयात
CEO पद मिळवत Sam Altman यांची OpenAI मध्ये घरवापसी…
OpenAI कडून कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांना काढून टाकल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामे द्यायला सुरूवात केली. शेवटी कर्मचाऱ्यांच्या दबावा पुढे कंपनी झुकली. तर आला सॅम ऑल्टमन हे पुन्हा OpenAI च्या सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रूजू होणार आहेत.
Animal Movie: ‘अॅनिमल’ प्रमोशनदरम्यान इंडस्ट्रीत बॉबी देओलची स्टाइल ठरतेय आयकॉन
याबद्दल कंपनीने त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली. यामध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही नवीन मंडळ तयार करून सॅम ऑल्टमन यांनी कंपनीत पुन्हा रूजू व्हावे म्हणून करार केला आहे. यासाठी आम्ही तपशील माहिती गोळा करत आहोत. तर या परिस्थितीमध्ये तुम्ही धीर धरला त्याबद्दल धन्यवाद.’ असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
We have reached an agreement in principle for Sam Altman to return to OpenAI as CEO with a new initial board of Bret Taylor (Chair), Larry Summers, and Adam D’Angelo.
We are collaborating to figure out the details. Thank you so much for your patience through this.
— OpenAI (@OpenAI) November 22, 2023
मिरा मुरातींच्या खांद्यावर दिली होती धुरा…
सॅम ऑल्टमन यांच्या जागी कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती (Mira Muratti) यांची नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती आता अंतरिम सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारणार होत्या. मीरा मुराती मूळची अल्बेनियन असून तिचे आई-वडील देखील अल्बेनियाचे आहेत. मीराचे शिक्षण कॅनडात झाले असून ती व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. डार्टमाउथ कॉलेजमध्ये पदवीच्या शिक्षणादरम्यान मीरा मुरतीने हायब्रीड रेस कार बनवली होती.
ऑल्टमन यांनी केले होते ट्विट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती आता अंतरिम सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारणार होत्या. तर काढून टाकल्यानंतर ऑल्टमनने ट्विट केले होते की, “मला ओपनएआयमधील माझा वेळ खूप आवडला. कंपनीत प्रतिभावान लोकांसोबत काम करताना मला सर्वाधिक आनंद झाला. राजीनामा हा परिवर्तनवादी निर्णय होता. आता मी काय करणार आहे, काय होईल ते नंतर सांगेन, असे म्हटले होते.