Operation Spider Ukraine : तीन वर्षांपासून सुरु असणाऱ्या रशिया – युक्रेन युद्धात (Russia – Ukraine War) आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले. तर आता सर्वांना धक्का देत युक्रेनने रशियावर (Russia) आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनने रशियन लष्करी ठिकाणांवर टार्गेट केले असल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी दिली आहे. याबाबात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले आहे. तसेच सुमारे दीड वर्षांपासून या हल्ल्याची योजना आखण्यास सुरुवात करण्यात आली होती अशी देखील माहिती झेलेन्स्की यांनी या पोस्टमध्ये दिली आहे.
युक्रेनने रशियाच्या एअरबेसवर हल्ला केला असून यासाठी 117 ड्रोन वापरण्यात आले होते तसेच हा हल्ला रशियाच्या अनेक प्रदेशांमध्ये तीन वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये करण्यात आला अशी देखील माहिती झेलेन्स्की यांनी दिली आहे.
झेलेन्स्की यांनी ‘एक्स’ वर लिहिले, “युक्रेनच्या सुरक्षा ऑपरेशनचे प्रमुख वासिल मालियुक यांनी आजच्या ऑपरेशनचा अहवाल सादर केला. नियोजन एक वर्ष, सहा महिने आणि नऊ दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते. हे आमचे सर्वात लांब पल्ल्याचे ऑपरेशन होते. ऑपरेशनच्या तयारीत सहभागी असलेल्या आमच्या लोकांना रशियन हद्दीतून वेळेवर बोलावण्यात आले.
Today, a brilliant operation was carried out. The preparation took over a year and a half. What’s most interesting, is that the “office” of our operation on Russian territory was located directly next to FSB headquarters in one of their regions.
In total, 117 drones were used in… pic.twitter.com/tU0SMN9jdB
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) June 1, 2025
युक्रेनच्या या यशाबद्दल जनरल मालियुक यांचे आभार. मी युक्रेनच्या सुरक्षा सेवेला या ऑपरेशनबद्दल जनतेला माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या सर्व काही सांगता येणार नाही, परंतु युक्रेनचा हा हल्ला इतिहासाच्या पुस्तकात नोंदवला जाणार आहे. रशियाने युद्ध सुरू केले आहे, रशियाने ते संपवले पाहिजे. युक्रेनचा गौरव!”
रशियन एअरबेसवर हल्ला
युक्रेनने रशियन एअरबेसवर हल्ला केल्याबद्दल रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, युक्रेनच्या ड्रोनने पाच एअरबेसवर हल्ला केला. ज्यामध्ये अज्ञात संख्येतील विमानांचे नुकसान झाले. तर दुसरीकडे या ऑपरेशन अंतर्गत रशियन बेसवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्यात आले असून रशियाचे 40 विमाने नष्ट करण्यात आली असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.
Head of the Security Service of Ukraine Vasyl Maliuk delivered a report regarding today’s operation. An absolutely brilliant result. A result achieved solely by Ukraine. One year, six months, and nine days from the start of planning to effective execution. Our most long-range… pic.twitter.com/oN41NFYyfw
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) June 1, 2025
तसेच या ऑपरेशनमध्ये एकूण 117 ड्रोन वापरले गेले आणि तेवढ्याच संख्येतील ड्रोन ऑपरेटर सहभागी होते. स्ट्रॅटेजिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी 34% एअरबेसवर तैनात असलेल्या विमानवाहू विमानांना लक्ष्य करण्यात आले. अशी माहिती देखील युक्रेनकडून देण्यात आली आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “कीव राजवटीने मुर्मन्स्क, इर्कुत्स्क, इव्हानोवो, रियाझान आणि अमूर येथील हवाई क्षेत्रांवर एफपीव्ही ड्रोन वापरून हल्ला केला. इव्हानोवो, रियाझान आणि अमूर येथील लष्करी हवाई क्षेत्रांवर सर्व हल्ले हाणून पाडण्यात आले.”
कर्ज स्वस्त होणार; RBI तिसऱ्यांदा कमी करणार रेपो दर; जाणून घ्या सर्वकाही
तर दुसरीकडे असा अंदाज लावला जात आहे की युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की इस्तांबूलमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीपूर्वी रशियावर दबाव आणू इच्छितात. रशियन अधिकारी व्लादिमीर मेडिन्स्की यांच्या नेतृत्वाखालील एक रशियन शिष्टमंडळ सोमवारच्या चर्चेसाठी आधीच तुर्कीला पोहोचले आहे. या चर्चेत काय होणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.