Download App

चीनसाठी काय पण! कंगाल पाकिस्तान सैन्यावर करणार अब्जावधींचा खर्च; निर्णय काय?

Pakistan News : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने (Pakistan News) आपल्याच पायांवर कुऱ्हाड मारणारा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खरं तर चीनला खुश (China) करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक क्षमता नसताना हा पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला (Pakistan Economy) आहे. सशस्त्र दलांसाठी ४५ अब्ज डॉलर्सच्या बजेटला मंजुरी देण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने सशस्त्र दालांसाठी अतिरिक्त ४५ अब्ज डॉलर्सच्या बजेटला मंजुरी दिली आहे.

द एक्स्प्रेस ट्रीब्यून च्या वृत्तानुसार हा निर्णय पाकिस्तान मंत्रिमंडळाच्या आर्थिक समन्वय समितीच्य बैठकीत नुकताच घेण्यात आला. वृत्तपत्राने म्हटले आहे की ४५ अब्ज रुपयापैकी ३५.४ अब्ज रुपये सैन्याला आणि ९.५ अब्ज रुपये नौसेनेला विविध उद्दिष्टांसाठी देण्यात येतील. रक्षा विभागाने दिलेल्या या प्रस्तावाला ईसीसीने मंजुरी दिली आहे. जून महिन्यात या बजेटला मंजुरी मिळाली होती. याआधी ईसीसीने एका मोहिमेसाठी ६० अब्ज रुपये दिले होते. हा निधी २१२७ अब्ज रुपयांच्या बजेटच्या व्यतिरिक्त आहेत.

UNGA: पाकिस्ताननं इतरांवर दुष्कृत्ये लादण्याचा प्रयत्न केला; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा थेट प्रहार

चीनची मागणी काय

दहशतवादी हल्ल्यांची वाढती संख्या लक्षात घेता चीनने सुरक्षितेत अधिक वाढ करण्याची मागणी केली होती. यासाठी चीनने दहशतवाद विरोधी (Pakistan China Relation) एका सहकार्य करारावर सही देखील केली आहे. चीनने पाकिस्तानातील आपल्या नागरिकांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्याचाही प्रस्ताव ठेवला होता.

IMF कडून पाकिस्तानला ७ बिलियन डॉलरचे कर्ज

आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने आयएमएफकडे ७ बिलियन डॉलर्सच्या कर्जाची मागणी केली होती. या कर्जाला आयएमएफने मंजुरी दिली आहे. पाकिस्तानला हे कर्ज ३७ महिन्यांच्या हप्त्यात मिळणार आहे. अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यासाठी हे कर्ज पाकिस्तानला मिळणार आहे. या कर्जातील १ बिलियन डॉलर तातडीने मिळणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी सांगितले होते की चीन आणि सऊदी अरबच्या मदतीने कर्जदात्याच्या सर्व अटी पूर्ण करता आल्या. या देशांनी मदत केली नसती तर कदाचित हे शक्य झालं नसतं.

China Earthquake : चीनमध्ये दुसऱ्या दिवशीही शक्तिशाली भूकंप; घरांची पडझड, नागरिकांची पळापळ

follow us