Download App

पाकिस्तानचा मोठा निर्णय! चिनी नागरिकांवर ‘या’ भागात घातली बंदी

पाकिस्तानच्या गृह विभागाने सांगितलं की, बुलेटप्रूफ वाहने वापरत नाहीत त्यांच्यावर सुरक्षेच्या कारणास्तव खैबर पख्तूनख्वावर भागात बंदी असेल.

Pakistan china Update : पाकिस्तानने मोठा निर्णय घेतला आहे. (Pakistan) पाकिस्तानने खैबर पख्तूनख्वामधील चिनी नागरिकांना प्रांतात प्रवास करण्यास बंदी घातली आहे. याबाबत खुलासा करताना सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. (Pakistan ban chinese) याबाबतच वत्त पाकिस्तानमधील डॉन या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

 

बुलेट प्रुफ गाड्यांचा वापर

या विषयावर बोलताना हजारा रेंजचे डीआयची ताहिर अयुब खान म्हणाले की, आम्ही चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहोत. तसंच, बुलेट प्रुफ गाड्या नसतील तर या प्रातांत फिरण्यास बंदी असेल असंही ते म्हणाले. 26 मार्च रोजी हल्लेखोराने चिनी अभियंत्यांच्या ताफ्याला लक्ष केलं होत. त्यामध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागला या घटनेचा संदर्भही त्यांनी यावेळी दिला आहे.

 

बालाकोट जलविद्युत प्रकल्प

डॉनच्या वृत्तानुसान डीआयजी खैबर पख्तूनख्वाचे जिल्हा पोलीस अधिकारी शफीउल्ला गंडापूर यांच्याशी काघन व्हॅलीच्या मलाकांडी भागातील सुकी किनारी प्रकल्पाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा झाल्यानंतर काही निर्णय घेण्यात आले. यावेळी त्यांनी सुकी किनारी आणि बालाकोट जलविद्युत प्रकल्पाच्या स्थळांना भेट दिली. तसंच, येथे सुरक्षेबाबतचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.

 

डिआयजी मोहम्मद इजाज खान निलंबीत

यावेळी चिनी अभियंते आणि कामगारांच्या वसाहतींच्या भिंती किमान 8 फूट उंच असतील आणि त्या काटेरी तारांनी मजबूत केल्या जातील. तसंच, सुरक्षा कर्मचारी चिनी अभियंत्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात संरक्षण दिलं जाईल, असंही या आढावा बैठकीत ठरवण्यातं आलं. चिनी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर माजी डिआयजी मोहम्मद इजाज खान यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर ताहिर यांना हे पद देण्यात आलं.

follow us

संबंधित बातम्या