Download App

Pakistan Hits Iran : पाकिस्तानचा पलटवार! इराणमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक?

Pakistan Hits Iran : दहशतवादाला खतपाणी घालून पोसणाऱ्या पाकिस्तानात काल इराणने एअर स्ट्राईक (Iran) केला. या हल्ल्यात बलुचिस्तानातील दहशतवादी संघटनेचा अड्डा उद्धवस्त करण्यात आला. या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगत आज पाकिस्तानने (Pakistan Hits Iran) बदल्याची कारवाई केली आहे. पाकिस्तानने इराणमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केल्याचा (Air Strike) दावा केला आहे. तसेच इराणच्या सीमेजवळ एका इराणी अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे. मात्र पाकिस्तानने इराणमध्ये नेमका कोणत्या ठिकाणी आणि कधी हल्ला केला याची खात्रीशीर माहिती मात्र अजून मिळालेली नाही. त्यामुळे या हल्ल्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Iran Attacks Pakistan : इराणचा पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक; दहशतवाद्यांचा अड्डा उद्धवस्त

पाकिस्तानी मीडियानुसार, इराणमधील आतंकवादी संघटना बीएलएच्या (Iran Pakistan Conflict) ठिकाणांना लक्ष्य करून हल्ले करण्यात आले. मात्र, पाकिस्तानकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तर दुसरीकडे इराणची वृत्तसंस्था आयएएनएनुसार इराणच्या रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सच्या एका अधिकाऱ्याची पाकिस्तान अफगाणिस्तानला लागून असलेल्या इराणच्या अशांत परिसरात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.

दरम्यान, याआधी पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीतून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी इराणने थेट (Iran) पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश अल अदलचे अड्डे उद्धवस्त करण्यात आले. या हल्ल्यांत अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा इराणच्या सैन्याने केला आहे. दुसरीकडे या हल्ल्यांत अनेक निरपराध लोकांचा बळी गेल्याचा आरोप करत या हल्ल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा पाकिस्तानने दिला होता.

Pakistan : इस्त्रायल-हमास युद्धाचा इफेक्ट! पाकिस्तानात नववर्षाच्या जल्लोषावर बंदी 

इराणचे इराक-सीरियात मिसाईल हल्ले 

इराणच्या रिवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRCG) निवेदनाच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की इराकी कुर्दिस्तानची राजधानी अर्बिलमध्ये एक गुप्तहेर मुख्यालय आणि इराणविरोधी आतंकवादी संघटनांच्या ठिकाणांना नष्ट करण्यात आले. या हल्ल्यांत चार लोकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. इराकच्या कुर्दिस्तान सुरक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यांत चार लोक ठार झाले आहेत तर सहा जण जखमी झाले आहेत. कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पार्टीने सांगितले की मारल्या गेलेल्या नागरिकांत येथील प्रमुख्य उद्योजक आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सहभाग आहे.

follow us