Pakistan News : पाकिस्तान सध्या कंगाल होण्याच्या दिशेने वेगाने (Pakistan News) वाटचाल करत आहे. या देशावर कर्ज इतके वाढले (Loan) आहे की या कर्जाचे व्याज देण्यासाठीही पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. यामुळेच आता पाकिस्तानी राज्यकर्ते कर्ज देणाऱ्या देशांचे दौरे करून कर्जाची मुदत वाढविण्याची विनंती करत आहेत. परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की चीन (China) वगळता कोणताही देश पाकिस्तानला कर्ज देण्यास तयार नाही. कोणताही पर्याय शिल्लक राहिला नसल्याने पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) कठोर अटी मान्य करत कर्ज उचलले आहे. आता या अटींचा दुष्परिणाम देशातील गरीब नागरिकांना सहन करावा लागत आहे.
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे (SBP) गवर्नर जमील अहमद यांनी सांगितले की २०२५ या आर्थिक वर्षासाठी पाकिस्तानला देणे असलेले एकूण विदेशी कर्ज 130 अब्ज डॉलर्स इतके आहे. पाकिस्तानला मित्र देशांकडून या कर्जात काही सवलती सुद्धा मिळाल्या आहेत. ज्यामुळे सरकार कर्जाचे हप्ते देण्यासाठी प्रयत्न करत आहे. नॅशनल असेंबली स्टॅंडिंग कमिटीच्या बैठकीत त्यांनी सांगितले की मित्र देश एकूण १६ बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त रकमेचे कर्ज परत देण्यासाठी पाकिस्तान सरकारला मुदतवाढ देणार आहेत. तरीही बँकेने आगामी काळात महागाई आणखी वाढणार असल्याचा इशारा दिला आहे.
2025 या आर्थिक वर्षासाठी पाकिस्तानला एकूण 26.2 अब्ज डॉलर्स कर्ज परत करायचे आहे. यातील साडेबारा अब्ज डॉलर्सच्या कर्जासाठी एक वर्ष मुदत देण्यास चीन, सऊदी अरब आणि युएई (संयुक्त अरब अमिरात) तयार झाले आहेत. या देशांनी पाकिस्तानला एक वर्षाची मुदत दिली असली तरी या मुदतीनंतर पाकिस्तानला कर्ज परत करावेच लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना दुसऱ्या देशांत दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम बंद करून उत्पन्न वाढविण्याच्या संधींवर जास्तीत जास्त भर द्यावा लागणार आहे.
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट, पाकिस्तानी व्यक्ती जाळ्यात; इराणशीही संबंध
वित्त सचिवानी या बैठकीत सांगितले की ४.४ बिलियन डॉलर चीनच्या कर्जाच्या रोल ओव्हर नंतर आयएमएफच्या कर्जाचा पाहिला हप्ता मिळणार आहे. ही रक्कम साधारण 7 अब्ज डॉलर्स इतकी असेल. बँकेने याआधी दीड अब्ज डॉलर्स कर्जापोटी दिले आहेत. त्यानंतर आता चालू आर्थिक वर्षात कर्जाचे आणखी साडेआठ अब्ज डॉलर्स देणे बाकी आहेत.
याशिवाय सरकारने सऊदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या कर्जासाठी एक वर्षाची मुदत मिळवली आहे. बँकेच्या गव्हर्नर यांनी मान्य केले की देशांतर्गत चलनवाढ नियंत्रित करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. बजेटमध्ये केलेल्या उपाययोजना आणि विजेच्या वाढत्या किमतींचा प्रभावामुळे महागाई १३.५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती आहे. गव्हाच्या वाढत्या किमती आणि मध्य पूर्व देशांत वाढता तणाव या कारणांमुळे महागाईच्या दबावाला आणखी वाढवू शकतो.
टीम इंडियाचा कारनामा! सामना टाय अन् एकाच वेळी पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडला पछाडले