Download App

पाकिस्तानी संघाला जपानमध्ये ‘नो एन्ट्री’, विमानतळावर दाखल होताच हकलून दिले; नेमकं घडलं काय?

Pakistan Football Team : जपानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या या घटनेची संपूर्ण जगात चर्चा पाहायला मिळत आहे.

  • Written By: Last Updated:

Pakistan Football Team : जपानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या या घटनेची संपूर्ण जगात चर्चा पाहायला मिळत आहे. जपानमध्ये एफआयएने मानवी तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सदस्य व्यावसायिक फुटबॉलपटू असल्याचे भासवून बेकायदेशीरपणे जपानमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र विमानतळावर असणाऱ्या जपानी अधिकाऱ्यांनी या फसवणुकीचा पर्दाफाश केला करत 22 संशयितांना अटक केली आहे.

पाकिस्तान संघ म्हणून विमानातून प्रवास

एफआयएने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी फुटबॉल संघाची (Pakistan Football Team) जर्सी घालून प्रवास करत होते. त्यांच्याकडे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रायलयाने जारी केलेले बनावट ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देखील होते. मात्र चौकशीदरम्यान जपानी अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यानंतर या गटाला पाकिस्तानला परत पाठवण्यात आले. तर दुसरीकडे हे व्यक्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय पाकिस्तानी विमानतळांवरुन कसे उड्डाण करु शकले याबाबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नसल्याचा दावा जिओ न्यूजने केला आहे.

फेक फुटबॉल क्लब

तर दुसरीकडे या प्रकरणात तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सियालकोटजवळील पसूर येथील रहिवासी मलिक वकासची ओळख पटवली आहे. त्याने गोल्डन फुटबॉल ट्रायल (Golden Football Trials) नावाचा फेक फुटबॉल क्लब तयार केला होता. वकासने प्रवासासाठी 4 दशलक्ष ते 5.4 दशलक्ष रुपये आकारल्याचा आरोप आहे. एफआयने त्याला 15 सप्टेंबर रोजी अटक केली आहे.

4 पिढ्या घाबरल्या पण आता बोलणार आणि आंदोलन करणार, लक्ष्मण हाके पुन्हा आक्रमक भूमिकेत

जानेवारी 2024 मध्ये वकासने अशाच बनावट कागदपत्रांचा आणि जपानी क्लब बोआविस्टा एफसीच्या बनावट आमंत्रणाचा वापर करून 17 लोकांना जपानला पाठवले. त्यापैकी कोणीही परत आले नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

follow us