Pakistan Election 2024 : आर्थिक संकटांनी घेरलेल्या पाकिस्तानात आजचा दिवस (Pakistan Election 2024) मतदानाचा आहे. पाकिस्तानातील नागरिक आज केंद्र आणि प्रांतीय सरकारांच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहे. पाकिस्तानातील यंदाची निवडणूक अनेक वादांमुळे चर्चेत राहिली. निवडणूक चिन्हांबाबतही असाच वाद निर्माण झाला होता. जेव्हा निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या (Imran Khan) पक्षाला बॅट चिन्ह नाकारले होते. आता खान यांच्या पक्षाचे नेते स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून त्यांना कोणते चिन्ह मिळाले याची जोरदार चर्चा होत आहे.
निवडणुकीतील उमेदवारांना मिळालेली चिन्हे गमतीशीर आहेत. राजकीय पक्षांना 150 तर अन्य अपक्ष उमेदवारांना 174 निवडणूक चिन्हे देण्यात आली. यामध्ये गाढव गाडी, प्रेसिंग बोर्ड, वाटी, चिकन, वांगी, बूट, वॉश बेसिन, नेल कटर, मोबाइल फोन चार्जर, सिमकार्ड, स्क्रू, चमचा, पॅन, फुगा, बेल, सायकल, दुर्बिण, बादली, बल्ब, फुलपाखरू, उंट, तोफ, खुर्ची, दिवा, मगर, हत्ती, पंखा, मासे, कारंजे, दार, गोफ, प्रेस, जीप, झाडू, चावी, शिडी, कप, बंदूक, अंगठी, ऑटोरिक्षा, हेल्मेट, पथदिवे, तलवार, ट्रॅक्टर आणि टायर ही काही निवडणूक चिन्हे आहेत.
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! PCB अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा
इम्रान खान यांच्या पक्षाचा निवडणुकीत पराभव झाल्याने मोठा गदारोळ झाला होता. मात्र निवडणूक चिन्हावरून पाकिस्तानात गदारोळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. उमेदवारांना मिळालेले चिन्ह अनेक वेळा वादाचे कारण ठरतात. अशाच एका चिन्हामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अपक्ष उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार चिन्ह निवडण्याची मुभा दिली जाते. परंतु, बऱ्याचदा निवडणूक अधिकारीच त्यांना चिन्हे देतात आणि हे चिन्हच उमेदवारांसाठी पुढे अडचणीची ठरतात.
लोकशाहीत निवडणुका महत्वाच्या असतात. पाकिस्तानात आज सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. आज दिवसभरात मतदान होणार आहे. पाकिस्तानातील जवळपास 40 टक्के जनता आजही निरक्षर आहे. ग्रामीण भागात तर हा आकडा 50 टक्क्यांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत या लोकांना उमेदवारांच्या ओळखीसाठी चिन्हाचाच आधार असतो.
Pakistan : पाकिस्तानात महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत ‘मोठ्ठी’ वाढ
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे पुनरागमन झाले आहे. शरीफ चौथ्या टर्मसाठी प्रयत्नशील आहेत. चार वर्षांच्या निर्वासित जीवनानंतर ते मागील ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानात परतले आहेत. त्यांच्यावर दाखल असलेले अनेक गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकीत उतरता आले. या निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यांची भीती असल्याने ही खबरदारी घेण्यात आल्याेच सांगितले जात आहे.