Download App

Video : ‘माझी हत्या करण्याचा ISI चा कट’; अटकेआधी Imran Khan यांचा खळबळजनक आरोप

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना आज अखेर अटक करण्यात आली. भ्रष्टाचारांच्या आरोपांखाली खान यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी न्यायालयात आले होते. यावेळीच रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले.

अटकेआधी इम्रान खान म्हणाले होते, की माझ्यावर कोणताही खटला नाही. त्यांचा मला तुरुंगात टाकण्याचा विचार आहे. यासाठी मी तयार आहे. आयएसआयची माझी हत्या करण्याची इच्छा आहे. यांच्या गुलामगिरीपेक्षा तर मरण पत्करणे चांगले आहे. माझ्यावर खोटे आरोप करून मला फसवण्यात येत आहे.

खान यांना अटक होण्याआधी रेकॉर्ड केलेला दुसरा व्हिडीओ जारी करण्यात आला. यामध्ये त्यांनी सांगितले, की पाकिस्तानात लोकशाही संपली आहे. यानंतर कदाचित मला पुन्हा तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार नाही. पाकिस्तानी जनता मला गेल्या पन्नास वर्षांपासून ओळखते.

मी कधीही पाकिस्तानी संविधानाविरोधात गेलो नाही. देशाचा कोणता कायदाही मी मोडला नाही. या भ्रष्ट चोर आणि इंपोर्टेड सरकारला असे वाटते की मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावे. आता तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी बाहेर पडावे लागेल. आता ती वेळ आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पाकिस्तानात अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. पीटीआय नेते अजहर मसानवी यांनी आरोप केला की रेंजर्सद्वारा न्यायालयाच्या आत इम्रान खान यांचे अपहरण करण्यात आले. दुसऱ्या एक नेत्याने ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत इम्रान खान यांना मारहाण केली जात असल्याचा आरोप केला. इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते पदाधिकारी सध्या संतप्त झाले आहेत. त्यांच्याकडून पाकिस्तान सरकावर गंभीर आरोप केले जात आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Imran Khan : खेळाचं मैदान गाजवणाऱ्या इम्रान खानला राजकारणानं पाठवलं तुरुंगात

Tags

follow us